पावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल

ठिकठिकाणी पावासाच्या पाण्यामुळे त्यामधून वाट काढत चालणे कठीण होऊन बसते. तर रस्त्यांवरील वाहतूकीच्या लांबच्या लांब रांगा यावेळी पाहायला मिळतात.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. ठिकठिकाणी पावासाच्या पाण्यामुळे त्यामधून वाट काढत चालणे कठीण होऊन बसते. तर रस्त्यांवरील वाहतूकीच्या लांबच्या लांब रांगा यावेळी पाहायला मिळतात. परंतु पावसाळ्याच्या दिवसात बाईकस्वरांना याचा मोठा फटका बसून रस्ते निसरडे झाल्याने अपघात होण्याची शक्यता फार असते. त्यामुळे जर तुम्ही पावसात बाईकवरुन प्रवास करत असल्यास अधिक सावधगिरी बाळगा.

तर पावसाळ्यात बऱ्याच वेळा बाईकस्वारांना वाहतुककोंडीत अडकून राहायला आवडत नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या छोट्या मार्गानेपण आपली बाईक तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा परिस्थितीत सावधानगिरी न बाळगल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात चुकूनसुद्धा 'या' गोष्टी करणे टाळा.

-बाईकचे टायर्स व्यवस्थित असावेत

जर तुमच्या बाईकचे टायर्स खराब झाल्यात प्रथम ते बदलून घ्या. कारण पावसाळ्यात खराब झालेल्या टायर्समध्येच तुम्ही बाईक चालवल्यास प्रवासादरम्यान काही अडथळे येऊ शकतात. त्याचसोबत निरसड्या झालेल्या रस्त्यांवर टायर्सची पकड बसत नाही.

-स्पीडवर नियंत्रण ठेवा

पावसाळ्यात अजिबात वेगाने गाडी चालवण्याचा प्रयत्न करु नका. कारण पावसाळ्यात रस्त्यांवर घर्षणाची क्षमता कमी झालेली असते. त्याचसोबत तुमचे गाडीवरील स्पीडचे नियंत्रण योग्य असणे फार महत्वाचे आहे. तसेच पावसाळ्यात बाईक चालवत असल्यास त्याचा स्पीड 30-40kmph एवढाच ठेवा.

-अंतर ठेवा

रस्त्यांवरुन चालताना नेहमीच दोन गाड्यांच्यामध्ये अंतर जरुर ठेवा. खासकरुन अवजड सामानवाहू गाड्यांपासून काही प्रमाणात अंतर ठेवून चालवणे सुरक्षितचे मानले जाते. तसेच गाडीचे हेडलाईट पावसात सुरुच ठेवा.

(आता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires)

त्याचसोबत पावसाचे पाणी रस्त्यांवर भरले असल्यास त्यामधून बाईकने जाणे टाळा. कारण रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे अशा परिस्थितीत उघडी ठेवली असल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असते. तसेच पाण्यातून बाईक काढत असाल तर पाणी एक्जॉस्टमध्ये जाऊन बंद पडू शकते