MG Gloster SUV भारतात लॉन्च, किंमत 28.98 लाख रुपये
MG Gloster भारतात 28.98 लाख रुपयांना लॉन्च केली आहे. ग्लोस्टर एक प्रीमियम एसयुवी असून त्यात बेस्ट इन क्लास फिचर्स दिले गेले आहेत. ग्लोस्टर भारतातील पहिलीच ऑटोनॉमस लेवल 1 एसयुवी आहे. कंपनीने या एसयुवीच्या बुकिंग्स सुरु केल्या आहेत.
MG Gloster भारतात 28.98 लाख रुपयांना लॉन्च केली आहे. ग्लोस्टर एक प्रीमियम एसयुवी असून त्यात बेस्ट इन क्लास फिचर्स दिले गेले आहेत. ग्लोस्टर भारतातील पहिलीच ऑटोनॉमस लेवल 1 एसयुवी आहे. कंपनीने या एसयुवीच्या बुकिंग्स सुरु केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असल्यास तुम्ही 2 लाख रुपयांची टोकन देऊन बुक करु शकता.कंपनीच्या एमजी ग्लोस्टर कारमध्ये दोन इंजिन ऑप्शन दिले गेले आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे 1996cc टर्बो डिझेल इंजिन असून जो 4000rpm वर 163 ची पॉवर आणि 1500-2400 rpm वर 375Nm चा टॉर्क जनरेट करतो. त्याचसोबत ट्रान्समिशनसाठी इंजिन 8 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स लैस आहे. हे इंजिन 2 व्हिल ड्राइव्ह आहे. यामध्ये दुसरा 1996cc चे डिझेल द्विन टर्बो इंजिन असून जे 4000rpm वर 218Ps ची पॉवर आणि 1500-2400 rpm वर 480Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. तर ट्रान्समिशनसाठी हे इंजिन 8 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स लैस आहे. हे इंजिन 4 व्हिल ड्राइव्ह आहे.
MG Gloster च्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, साइड आणि फुल लेंग्थ कर्टेन एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, हिल डिसेंट कंट्रोल, अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ईबीडी आणि ब्रेक एसिस्ट रोल मूवमेंट इंटरवेंशन, हिल होल्ड कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर्स मिळणार आहेत.(2020 Mahindra Thar SUV भारतात लॉन्च, किंमत 9.80 लाख रुपये)
Presenting special introductory prices for MG Gloster, starting at Rs 28,98,000 (ex-showroom, Delhi).
Book now! https://t.co/nqIl0V1gZs#TheSelflessCar pic.twitter.com/jdp7FndQIv
— Morris Garages India (@MGMotorIn) October 8, 2020
कारचे डायमेन्शन मध्ये त्याची लांबी 4985 मिलीमीटर, रुंदी 1926 मिलीमीटर आणि उंची 1867 मिलीमीटर आहे. याचे व्हिलबेस जवळजवळ 3 मीटर आहे. यामध्ये 19 इंचाचे अलॉय व्हिल्स दिले गेले आहेत. एमजी हेक्टर मध्ये 12.3 इंचाचा इंन्फोटेनमेंट सिस्टिम, iSmart 2.0 तंत्रज्ञान, 12- स्पीकर सिस्टिम, 64 एम्बियंट लाइटिंग, 8 इंचाचा डिजी एनॉलॉग ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, पॅनोरोमिक सनरुफ आणि मीडिल कॅप्टन सीट सारखे फिचर्सचा समावेश आहे. ही एसयुवी 70 हून अधिक कार कनेक्टेड फिचर्स लैस आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2020 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

