Mercedes-Maybach S650 Guard: PM Narendra Modi यांच्या ताफ्यात नव्या कारचा समावेश; गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होणार नाही, जाणून घ्या काय आहे खास  

2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी BMW 7 सीरीज हाय-सिक्युरिटी एडिशन वापरले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी कारचे अपग्रेडेशन करण्यात आले

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ताफ्यात नवीन मर्सिडीज कारचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ही नवीन कार आणण्यात आली आहे. त्याचा मॉडेल क्रमांक मर्सिडीज-मेबॅक एस 650 गार्ड (Mercedes-Maybach S650 Guard) असा आहे. ही कार अनेक उत्तमोत्तम आणि हायटेक फीचर्सनी सुसज्ज आहे, परंतु तिची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यावर गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होत नाही. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या कारमध्ये दिसले होते. मोदींच्या या नव्या कारमध्ये काय खास आहे, जाणून घेऊया.

ही कार 516bhp पॉवर आणि 900Nm टॉर्क जनरेट करू शकते. कारचा टॉप स्पीड 160 किमी प्रतितास आहे. कारच्या आत मसाज सीट आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यानचा थकवा दूर होईल. प्रवासी आवश्यकतेनुसार लेगरूम वाढवू शकतात. Mercedes-Maybach S650 Guard हे फेसलिफ्ट मॉडेल आहे ज्याची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे. इतर कोणत्याही कारच्या तुलनेत याची सुरक्षा पातळी सर्वोच्च आहे. (हेही वाचा: Dual-Mode Vehicle: जपानने सादर केली जगातील पहिली ड्युअल-मोड बस; रस्त्यासह रेल्वे रुळांवरही धावणार)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये प्रवास करायचे. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी BMW 7 सीरीज हाय-सिक्युरिटी एडिशन वापरले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी कारचे अपग्रेडेशन करण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif