Maruti Suzuki: मारुती सुझुकीने परत मागवल्या 1,34,885 WagonR व Baleno गाड्या; Fuel Pump मध्ये आढळला दोष
रिकॉल म्हणजे, कोणत्याही बिघाड किंवा दोष असलेल्या वाहनांना परत बोलावण्याची घोषणा. कंपनी 1,34,885 वॅगनआर (WagonR) आणि बलेनो (Baleno) परत मागवीत आहे.
दिग्गज ऑटो कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) बुधवारी एका मोठ्या रिकॉलची (Recalls) घोषणा केली. रिकॉल म्हणजे, कोणत्याही बिघाड किंवा दोष असलेल्या वाहनांना परत बोलावण्याची घोषणा. कंपनी 1,34,885 वॅगनआर (WagonR) आणि बलेनो (Baleno) परत मागवीत आहे. फॉल्टी इंधन पंप (Fuel Pump) प्रकरणामुळे मारुती सुझुकीने वॅगनआर आणि बलेनो गाड्या परत मागविल्या आहेत. यामध्ये कंपनी 56,663 वॅगनआर आणि 78,222 बलेनो परत मागवीत आहे. या वाहनांचे इंधन पंप तपासणे आणि संभाव्य दोष करणे हे या रिकॉलचे कारण असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
मारुती सुझुकीचे म्हणणे आहे की, ज्या वॅगनआर मॉडेलला परत मागवले आहे ते, 1.0 लिटर इंजिनसह येते आणि ती 15 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान तयार केली गेली आहेत. त्याच वेळी, मारुती सुझुकी बलेनो मॉडेल पेट्रोल व्हेरीएंटमध्ये येते आणि ही गाडी 8 जानेवारी 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 दरम्यान बनवली आहे. कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही दोष असलेली वाहने तपासू आणि खराब भाग विनामूल्य बदली करु.' या रिकॉल मोहिमेअंतर्गत प्रभावित वॅगनआर आणि बलेनो हॅचबॅकच्या मालकांकडे येत्या काही दिवसांत मारुती सुझुकीचे अधिकृत डीलर्स संपर्क साधतील. (हेही वाचा: Skoda Rapid Rider Plus भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत)
आपल्याकडे जर का मारुती सुझुकी बलेनोचे पेट्रोल व्हेरीएंट किंवा मारुती सुझुकी वॅगनआर चे 1.0 लिटर मॉडेल असल्यास, आपली कार परत मागवली आहे की नाही हे आपण स्वतः तपासून पाहू शकता. आपल्याकडे वॅगनआर असल्यास, आपण marutisuzuki.com वर जाणे आवश्यक आहे. त्याच वेळी, बलेनो मालकांना nexaexperience.com वर भेट द्यावी लागेल. येथे आपण Imp Customer info विभागात क्लिक करा व त्यानंतर आपल्याला आपल्या कारचा चेसिस क्रमांक (MA3 किंवा MBH नंतर 14 अंकी अल्फा-न्यूमरिक नंबर) प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर आपणास समजेल की, आपली कार परत द्यावी लागणार आहे का नाही.