Maruti Suzuki डिझेल कार होणार रस्त्यावरून गायब, 2020 पासून विक्री बंद

1 एप्रिल 2020 पासून देशात मारुती सुझुकी कंपनीच्या डिझेल कार विकल्या जाणार नाहीत चेअरमन आर.सी.भार्गवा

(Photo Credits: Facebook)

नवी दिल्ली, 25 एप्रिल: देशातील ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रातील फार जुनं नाव म्हणजे Maruti Suzuki. जनसामान्यांना परवडेल अशा दरात चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध अशी या कंपनीची ओळख होती. मात्र गुरुवार, 25 एप्रिल ला Maruti Suzuki India (MSI)चे चेअरमन आर.सी.भार्गवा यांनी पुढील वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून देशात मारुती सुझुकी कंपनीच्या डिझेल कार विकल्या जाणार नाहीत अशी घोषणा केली.

या निर्णयाचे कारण अभ्यासताना देशात डिझेलच्या वाढत्या दरांचा आणि भारत स्टेज ६ या अंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ऑटोमोबाईल क्षेत्रावर लावलेल्या आर्थिक भाराचा जबर फटका या कंपनीला लागल्याचं समोर येत आहे. यामुळे 2020 पासून आपल्या पोर्टफोलिओ मधून सर्व डिझेल कार वगळायचा निर्णय कंपनीने घेतला आहे असे ही भार्गवा यांनी सांगितले. तब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय

"सध्या सुरु असणाऱ्या गाड्यांच्या विक्रीनुसार साधारण 23टक्के मिळकत ही डिझेल कार मुळे होत आहे मात्र इतके प्रमाण व्यापार सुरळीत चालू ठेवण्यासाठी पुरेसे नाही, दिल्ली सारख्या प्रमुख बाजारातून देखील कमी मागणी अनुभवायला मिळतेय. या शिवाय डिझेल कार वरील कर अधिक आहे व रेजिस्ट्रेशन प्रमाणपत्र देखील 10 वर्षांच्या मर्यादेतच मिळते त्यामुळे मागणी कमी होत असल्याचे", कंपनीने सूत्रांना सांगितले.