Mahindra XUV700 ठरणार कंपनीची नवी 7 सीटर SUV, प्रीमियम फिचरसह जाणून घ्या काय असणार खास

देशाची दिग्गज वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्रा भारतात आपली नवी 7 सीटर एसयुवी वर काम करत आहे. कंपनीने आज या एसयुवीच्या नावाची घोषणा केली आहे.

Representative Image (Photo Credits: mahindratuv300.com)

देशाची दिग्गज वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्रा भारतात आपली नवी 7 सीटर एसयुवी वर काम करत आहे. कंपनीने आज या एसयुवीच्या नावाची घोषणा केली आहे. भारतात या आगामी 7 सीटर एसयुवीला महिंद्रा XUV700 च्या नावाने ओळखले जाणार आहे. जी W601 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, या कारचे नाव XUV700 असणार आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कंपनी आपली XUV500 चे नाव बदलून XUV700 करत आहे. त्याचसोबत आणखी एक नवी एसयुवी सुद्धा लॉन्च केली जाणार आहे.(Suzuki Hayabusa लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

महिंद्रा कंपनीचे ग्लोबल प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे प्रमुख वेलुसामी यांनी असे म्हटले आहे की, ही कार तरुणांसाठीच खास तयार करण्यात आली आहे. एक्सयुवी पोर्टफोलिओ नेहमीच XUV 500 आणि XUV300 सारख्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. अशातच आता एक नवी कार उतरवली जाणार आहे. XUV700 ही नव्या जागतिक एसयुवी प्लॅटफॉर्म W60 वर तयार केली जाणार आहे. जी काही खास तंत्रज्ञानासह सुविधा देणार आहे.

महिंद्रा XUV700 SUV ही Sci-Fi तंत्रज्ञानासह काही सेगमेंटच्या उत्तम विशेषतांपेक्षा लैस आहे. यामध्ये इंजिन ऑप्शन आणि स्पेक्स संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र कंपनीचे असे म्हणणे आहे की, ही आगामी महिंद्रा एसयुवी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ऑप्शनल ऑल-व्हिल ड्राइव्हसह उतरवली जाणार आहे.(2021 Royal Enfield Classic 350 दमदार डिझाइनमध्ये लॉन्च, मिळणार 'हे' दमदार फिचर्स)

कंपनीची ही का पुण्यातील चाकण येथे तयार केली जाणार आहे. तर सणासुदीच्या दिवसात ती लॉन्च केली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान कंपनीने आपली नवी सफारी सुद्धा लॉन्च केली आहे. ज्याला भारतीय बाजारात जबदरस्त प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ही एसयुवीच्या किंमती संदर्भात ही कोणताच खुलासा करण्यात आलेला नही. मात्र जर ती भारतात लॉन्च झाल्यास Hyundai Alcazar ला टक्कर देणारी ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now