महिंद्रा कंपनीची Bolero मॉडेल महागली, जाणून घ्या नवी किंमत
देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी महिंद्राने भारतात त्यांची प्रसिद्ध एसयुव्ही Bolero ची किंमत वाढवली आहे. नवी बोलेरो मार्च 2020 मध्ये उत्तम स्टायलिंग, अपडेटेड इंटिरियर आणि बीएस6 कंम्पालइंट इंजिनसह लॉन्च करण्यात आली होती. याची किंमत 7.89 लाख ते 8.99 लाख रुपये ठरवली होती. परंतु कंपनीने याच मॉडेलच्या किंमतीत वाढ करत ती आता 35 हजारांनी महाग केली आहे. बोलेरोची किंमत वाढवल्यानंतर याच्या BS4 मॉडेलची किंमत 8.00 लाख रुपये, BS6 मॉडेलची किंमत 8.66 लाख रुपये आणि BS(O) वर्जनची किंमत 9.01 लाख रुपये झाली आहे. महिंद्राने नवी बोलेरोमध्ये अपडेट ग्रिल, फ्रेश फ्रंट बंम्पर आणि हेडलॅम्पसह त्याच्या डिझाइनमध्ये काही बदलाव केले होते.
2020 Mahindra Bolero मध्ये BS6 कंम्पलाइंट 1.5 लीटर 3 सिलिंडर युक्त mHawk75 डिझेल इंजिनचा उपयोग केला आहे. जो 75Bhp ची पॉवर देण्यास सक्षम आहे. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडला आहे. बोलेरो SUV फक्त रियर-व्हिल-ड्राइव्ह सिस्टिमसह येणार आहे. बोलेरो ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. याच्या रियरवर देण्यात आलेले लीफ स्प्रिंग सस्पेंशनचा भार उचलण्यासाठी डिझाइन केले आहे. सध्या भारतीय बाजारात या कारची कोणासोबत टक्कर नाही आहे.(Honda Amaze ठरली सर्वाधिक विक्री करण्यात आलेली कार, सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये)
फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास बोलेरो मध्ये ड्रायव्हर एअरबॅग, EBD सह ABS, रियर पार्किंग सेंसर आणि स्पीड अलर्ट स्टँडर्डच्या रुपात दिले आहेत. त्याचसोबत यामध्ये टॉप-स्पेक B6 मध्ये प्रवाश्याला साइड एअरबॅगसुद्धा मिळणार आहे.