भारतात Made In China च्या Tesla कारला नो एन्ट्री- नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, भारतात मेड इन चायनाच्या टेस्ला कारला एन्ट्री मिळणार नाही. त्यांनी पुढे असे म्हटले की, भारतात टेस्लाचे स्वागत आहे. पण त्यांच्याकडून त्याचे चीनमध्ये उत्पादन करुन ते भारतात विक्री करायचे असेल तर हे देशासाठी ठीक नाही आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, भारतात मेड इन चायनाच्या टेस्ला कारला एन्ट्री मिळणार नाही. त्यांनी पुढे असे म्हटले की, भारतात टेस्लाचे स्वागत आहे. पण त्यांच्याकडून त्याचे चीनमध्ये उत्पादन करुन ते भारतात विक्री करायचे असेल तर हे देशासाठी ठीक नाही आहे. गडकरी त्यावेळी बिझनेस टुडे च्या एका कार्यक्रमात बोलत होते.(टाटा मोटर्स लवकरच घेऊन येणार Tata Punch च्या अॅडिशनल वर्जनमधील 'ही' कार, आयपीलए 2022 मध्ये झळकवणार)
नितीन गडकरी यांना टेस्लाच्या Tax Demand बद्दल विचारण्यात आले. तेव्हा गडकरी यांनी म्हटले की, बहुतांश लोक मला भेटण्यासाठी येतात. मी त्यांना सांगतो की, भारत एक मोठा बाजार असून जे येथे नाहीत ते संधी गमावत आहेत. एक सत्य आहे की, आधीपासूनच बीएमडब्लू, ह्युंदाई, टोयोटा या सर्व कंपन्या उत्तम गुणवत्तेसह येत असून अधिक रिसर्च करत आहेत. तसेच टाटा आणि महिंद्रा यांच्यासारख्या भारतीय कंपन्या सुद्धा नव्या रिसर्चवर काम करत आहेत. नव्या टेक्नॉलॉजी ते वीजेला इंधनाच्या रुपात वापरले जात आहे.
पुढे गडकरी यांनी इथेनॉलच्या वापरासह ग्रीन एनर्जी बद्दल ही आपले मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ऑटो कंपन्या फ्लेक्स इंजिनवर काम करत आहेत. यामुळे इथेनॉलचा अधिकाधिक वापर केला जाईल. हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल. आमचे लक्ष हे प्रत्येक सेक्टरमध्ये अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याकडे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2022-23 मध्ये हे आधीच स्पष्ट केले आहे.(इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार)
तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारत सरकारकडून इम्पोर्ट ड्युटीवर सूट द्यावी अशी मागणी करत आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, भारतात इम्पोर्ट करण्यास ते पूर्णपणे तयार आहेत. भारतात अशा इम्पोर्टवर 100 टक्के टॅक्स लावला जातो. भारत सरकारचे यावर असे म्हणणे आहे, टेस्ला कंपनीने आपल्या कार येथे तयार कराव्यात किंवा पार्ट इम्पोर्ट करुन ते एकत्रित करावेत. गडकरी यांनी आधी सुद्धा स्पष्ट केले होते की, टेस्लाने भारतात मेड इन चायना गाड्या डम्प करण्याऐवजी येथे फॅक्ट्री तयार करण्याचा विचार करावा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)