Isuzu D-Max V-Cross चे BS6 मॉडेल भारतात लॉन्च, जाणून ऑफर्ससह खासियत

कंपनीने याची सुरुवाती किंमत 16.98 लाख रुपये ठेवली आहे. भारतीय बाजारात या कारचे तीन वेरियंट्स उपलब्ध करुन दिले जाणारआहेत.

Isuzu D-Max V-Cross BS6 (Photo Credits-Twitter)

इसुजु मोटर्स इंडिया (Isuzu Motors India) यांनी भारतात V Cross आणि MU-X रेंज वाहनांचे BS6 मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने याची सुरुवाती किंमत 16.98 लाख रुपये ठेवली आहे. भारतीय बाजारात या कारचे तीन वेरियंट्स उपलब्ध करुन दिले जाणारआहेत. यामध्ये D-Max Hi-Lander, D-Max-V-Cross X 2WD AT आणि D-Max V-Cross Z Prestige 4WD AT यांचा समावेश आहे. कंपनीने याचे एन्ट्री लेव्हल Hi Lander वेरियंट सुद्धा उतरवले आहे.(Hyundai ने झळकवला त्यांच्या पहिल्या मायक्रो एसयुवीचा टीझर, 4 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता)

या ट्रक्सच्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने यामध्ये 1.9 लीटरचे टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. 163bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 360 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीने हाय लॅंडरच्या नव्या वेरियंटला सुद्धा मार्केटमध्ये उतरवले आहे. त्याची किंमत 17.04 लाख रुपये आहे.(नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे)

Tweet:

BS6 Isuzu D-Max-V-Cross रेंजमध्ये आता बाय-LED प्रोजेक्टर लैस हेडलॅप्स, LED DRLs आणि LED टेललाइट्स दिले आहे. दुसऱ्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 4 व्हिल ड्राइव्ह, क्रुज कंट्रोल, साइड-स्टेप, 18 इंचाचे अलॉय व्हिल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल शिफ्ट-ऑन-फ्लाय आणि टॉप वेरियंट्समध्ये 7 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली गेली आहे. इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल ड्रायव्हर्स सीट, 8 स्पीकर ऑडिओ सिस्टिमसह रुफ माउंडेट स्पिकर्स दिले आहेत.

कंपनीच्या प्रबंध निर्देशक त्सुगु फुकुमुरा यांनी असे म्हटले की, भारतीय मार्केट आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण इसुजुची जागतिक पातळीवर झळकवली जाणारी उत्तम टेक्नॉलॉजी सातत्याने भारतात आणत आहोत. अशातच वाहन बनवण्यासाठी आम्ही जगभरात प्रसिद्ध आहोत जे विश्वासू आहे, फ्यूल एफिशियंट आणि मजबूत असतात. आम्ही या वाहनांची नवी BS6 रेंज लॉन्च केली आहे. यामध्ये तुम्हाला सर्व खासियत मिळणार आहे.