घरी कुणीतरी आतुरतेने वाट पाहते ना! मग, गाडी चालवताना या गोष्टींचे भान ठेवा

म्हणूनच गाडी चालवताना कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात हे आम्ही आपल्याला सूचवू इच्छितो....

(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

गाडी आपली आहे, रस्ता नाही. त्यामुळे आपल्याप्रमाणेच इतरही अनेक लोक रस्त्यावरुन प्रवास करतात. अशा वेळी घडणाऱ्या एखाद्या छोट्याशा चुकीची भयंकर शिक्षा आपल्यासह समोरच्याला मिळू शकते. म्हणून गाडी चालवताना काही गोष्टींचे भान बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच गाडी चालवताना कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात हे आम्ही आपल्याला सूचवू इच्छितो....

फोनचा वापर

गाडी चालवताना फोनचा वापर कटाक्षाने टाळा. यामुळे तुमच्या आणि समोरच्याच्याही जीवालाही प्रचंड धोका असतो.

वाहतुकीचे नियम

गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. ते पाळल्याने आपला प्रवास सुखाच होतोच. पण, समोरच्याचाही होतो. ज्यामुळे अपघातासारख्या अप्रिय घटना टाळता येऊ शकतात.

वेगावर नियंत्रण ठेवा

रस्ता, रहदारी आणि वेग याचे नेहमी भान बाळगा. चुकीच्या पद्धतीने गाडी ओव्हरटेक करणे, अरुंद जागेतून गाडी पुढे दामटने, उगाचच घाई करुन गाडीचा वेग वाढवणे या गोष्टी कटाक्षाने टाळा.

हेडलाईट्स पॉलीश

एका मुलायम कापडावर टूथपेस्ट घ्या. त्याने गाडीची हेडलाईट साफ करा. काही मिनिटातच गाडीची हेडलाईट चमकायला लागेल. गाडी चालवताना योग्य प्रकाश असणे महत्त्वाचे आहे. (हेही वाचा, कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..)

आरसा अॅडजेस्ट करा..

अभ्यासक सांगतात की, गाडी चालवताना आरसा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरसा अॅडजेस्ट करताना काळजीपूर्वक लक्ष द्या. जेनेकरून गाडीचा बराचसा भाग आपल्याला त्यात दिसेल. तसेच, पाठीमागचा परिसरही पाहता येईल.