IPL Auction 2025 Live

Hyundai ने 16,409 गाड्या ग्राहकांकडून परत मागवल्या कार, गाड्यांमध्ये आहे 'हा' प्रॉब्लेम

या सर्व कारमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट देण्यात आले आहे.

Hyundai Grand i10 Nios (Photo Credits: Hyundai)

दर्जेदार आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे भारतातील नावाजलेली गाड्यांची कंपनी Hyundai आपल्या दोन कार्सचे मॉडेल्स परत मागवले आहेत. यामध्ये Grand i10 आणि Xcent या मॉडेल्सचा समावेश असून यात एकूण 16,409 सीएनजी गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत. 1 ऑगस्ट 2017 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत करण्यात आलेल्या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने या गाड्यांमध्ये काही त्रुटी आढळल्याचे सांगितले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सीएनजी फिल्टर अॅसेम्बलीमध्ये त्रुटी असल्याने गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. या सर्व कारमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट देण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- Royal Enfield कंपनीने लॉन्च केली Royal Enfield Classic 350; बाईकरमागे मित्रच काय गर्लफ्रेंडही नाही बसू शकणार

कंपनीने परत मागवलेल्या कारचे चेकिंग करण्यासाठी 25 नोव्हेंबरपासून ह्युंदाईचे वर्कशॉप सुरू करण्यात येईल. यासाठी कंपनी डीलर्सच्या माध्यमातून कार मालकांशी संपर्क करेल. वर्कशॉपमध्ये कार चेंकिंगसाठी एक तासाचा वेळ लागेल. कारच्या सीएनजी फिल्टर अॅसेंब्लीमध्ये त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त करण्यात य़ेईल. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायलेट एफ 77 लाँच; चार्जिंग केल्यानंतर चालणार 150 किलोमीटर

हयुंदाईने जारी केलेल्या नोटिसीत म्हटलं आहे की, या कार नॉन-एबीएस मॉडेलच्या आहेत. अशा परिस्थितीत शक्यता आहे की, परत मागवण्यात आलेल्या कारमध्ये सर्वाधिक प्राइम मॉडेल म्हणजेच टॅक्सी सर्विसमध्ये असलेल्या कारचा समावेश असेल.

ह्युंदाईची प्राइम मॉडेल्स खरंतर नव्या कारचे जुनं व्हर्जन आहेत. सध्या ग्रँड आय़10 आणि अॅक्सेंट फ्लीट (टॅक्सी सर्विस) साठी उपलब्ध आहेत. कंपनीने मर्यादित कालावधीसाठी फर्स्ट जनरेशन अॅक्सेंटला सीएनजीसह उपलब्ध करून दिलं होतं. सेकंड जनरेशन अॅक्सेंटमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी देण्यात आलेलं नाही.