Hyundai-Kia Car Recall: ह्युंदाई आणि किआ कार्समध्ये आग लागण्याचा धोका, कंपनीने परत मागवल्या 6 लाखांहून अधिक गाड्या, जाणून घ्या कुठे व कधी सुरु होईल रिकॉल
या रिकॉल अंतर्गत, दोन्ही कंपन्या 6 लाखाहून अधिक वाहने परत मागवणार आहेत
कोरियन कार उत्पादक ह्युंदाई मोटर (Hyundai Motor) आणि किआ मोटर्सने (Kia Motors) ने त्यांच्या मोटारी परत मागवल्याची घोषणा केली आहे. या रिकॉल अंतर्गत, दोन्ही कंपन्या 6 लाखाहून अधिक वाहने परत मागवणार आहेत आणि त्यांच्यामधील दोषांचे निराकरण करुन त्यांना परत आपल्या ग्राहकांकडे पोहोचवतील. हे रिकॉल अमेरिका (US) आणि कॅनडा (Canada) येथे केले जाईल. या दोन्ही कारमध्ये ब्रेक फ्लूइड (Brake Fluid) गळतीची समस्या आहे. कार कंपन्यांच्या मते, या दोषामुळे कारमध्ये शॉर्ट सर्किट आणि आग लागण्याची शक्यता आहे. यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने (NHTSA) यासाठी आपला तपास सुरू केला आहे.
या रिकॉलमध्ये 2013 ते 2015 दरम्यान डिझाइन केलेल्या 440,000 हून अधिक किआ ऑप्टिमा, 2014 ते 2015 या कालावधीत तयार केलेल्या किआ सोरेंटो सह 2013 ते 2015 पर्यंत तयार केलेल्या 203,000 ह्युंदाई सांता फे एसयूव्ही समाविष्ट आहेत. ह्युंदाई ने सांगितले की फ्लूइड गळतीमुळे इंजिनला आग लागल्याच्या 15 घटना घडल्याची बातमी समोर आली आहे, त्यात किती लोक जखमी झाले आहेत, हे कळू शकले नाही. तर किआने सांगितले की असे 8 अपघात घडले आहेत.
ह्युंदाईने एक निवेदन जारी केले आहे की, समस्येचे निराकरण केल्याशिवाय कार बाहेर पार्क करण्याची गरज नाही, परंतु कार चालवू नका, परंतु जेव्हा अँटी-लॉक वॉर्निंग लाइट लागेल तेव्हा कार चालवू नका आणि त्वरित आपल्या डीलरला कळवा. कारमधून 12 व्होल्टची बॅटरीची पॉझिटिव्ह केबल काढून टाका. दोन्ही कंपन्यांचे डीलर्स कंट्रोल युनिटमधील गळतीची तपासणी करुन ती बदलून देतील, यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार नाहीत. (हेही वाचा: Hero ची इलेक्ट्रिक स्कूटर आता 30 मिनिटांत चार्जिंग झाल्यास कापणार 130km चे अंतर, जाणून घ्या कंपनीच्या नव्या प्लॅन बद्दल अधिक)
ब्रेक फ्लुइडमुळे कारमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट होऊ शकतो, यामुळे कारला कोणत्याही वेळी आग लागू शकते. अशा परिस्थितीत कार चालविणे अत्यंत धोकादायक सिद्ध होऊ शकते. किआची रिकॉल 15 ऑक्टोबरपासून सुरु होईल, तर ह्युंदाईची रिकॉल 23 ऑक्टोबरपासून सुरु होईल.