Hyundai Creta डायमंड एडिशनची खास वैशिष्ट्ये
ह्युंदाई क्रेटा डायमंड एडीशन एसयूव्ही 2017 च्या लेटेस्ट क्रेटावर आधारीत आहे. यात मॉडेलमध्ये पॅनारोमिकसनरुफ, यूनीक एक्सटीरियर पेंट शेड्स आणि प्रीमियम कल्टेड लेदर सीट दिली जाणार आहे.
एसयूव्ही गाड्यांमध्ये Hyundai Creta ही भलतीच लोकप्रिय आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये साओ पोऊलो मोटर शोमध्ये नव्या Hyundai Cretaचे पदार्पण होणार आहे. ही कार कंपनी Hyundai Creta Diamond Edition नावाने सादर करेन. मोटार शोमध्ये नवी ह्युंडाई क्रेटाला Saga SUV संकल्पनेसोबत सादर केली जाईल. साओ पाऊलो मोटर शो 8 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत चालणार आहे.
ह्युंदाई क्रेटा डायमंड एडीशन एसयूव्ही 2017 च्या लेटेस्ट क्रेटावर आधारीत आहे. यात मॉडेलमध्ये पॅनारोमिकसनरुफ, यूनीक एक्सटीरियर पेंट शेड्स आणि प्रीमियम कल्टेड लेदर सीट दिली जाणार आहे. क्रेटा डायमंड एडिशन या एसयूव्हीचे टॉप व्हेरियंट असू शकते.
दक्षिण अमेरिकेतील बाजारात ह्युंडाई क्रेटाचे डीजेल इंजिन पर्यायी उपलब्ध नाही. तेथे हे मॉडेल फ्लेक्सी-फ्यूल इंजिनच्या दोन पर्यांयमध्ये उपलब्ध असते. एक 1.6 लीटर इंजिन आहे. जे 130 एचपीची पॉवर जनरेट करते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक, दोन्ही गियरबॉक्स भेटतात. दुसरे 2.0 लीटर इंजिन आहे. जे 166 एचपी पॉवर जनरेट करते. यात ऑटोमॅटीक गियरबॉक्स स्टॅंडर्ड दिले गेले आहे. (हेही वाचा, घरी कुणीतरी आतुरतेने वाट पाहते ना! मग, गाडी चालवताना या गोष्टींचे भान ठेवा)
भारतीय बाजारात ह्युंडाईने मे मध्ये क्रेटा फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले होते. क्रेटाच्या फेसलिफ्ट व्हर्जन 6 व्हेरियट्स E, E+, S, SX, SX dual tone, आणि SX (O)मध्ये विकले जाते. यात 1.4-litre आणि 1.6-litre डिझेल युनिट्स सोबतच 1.6 लीटर पेट्रोल यूनिटचा पर्याय आहे. याचे मायलेज व्हेरियट्नसनुसार 14.8km/l ते 20.5km/l पर्यंत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)