Honda XL750 Transalp 2025: ऑफ-रोड प्रेमींना खूश करणारी होंडाची नवीन ॲडव्हेंचर बाईक भारतात लॉन्च
Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने भारतात नवीन 2025 Honda XL750 Transalp ॲडव्हेंचर बाइक लॉन्च केली असून तिची एक्स-शोरूम किंमत ₹10.99 लाख आहे. बुकिंग सुरू झाली असून जुलै 2025 पासून डिलिव्हरी सुरू होणार.
Adventure Motorcycles India: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) ने अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित होंडा एक्सएल750 ट्रान्सल्प (XL750 Transalp) लाँच केले आहे. एचएमएसआय (HMSI) द्वारे बाजारात दाखल करण्यात येत असलेली, ही अष्टपैलू साहसी मोटरसायकल शहरातील दैनंदिन प्रवास, लांब अंतराची टूरिंग आणि खडतर ऑफ-रोड ट्रेकसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकसाठी देशभरातील Honda BigWing डीलरशिप्सवर बुकिंग (Honda Bike Booking India) सुरू झाले असून जुलै 2025 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
किंमत व उपलब्धता
होंडा एक्सएल750 ट्रान्सल्प ही बाईक बाजारात ₹10.99 लाख (एक्स-शोरूम गुरुग्राम, हरियाणा) या किमतीत उपलब्ध आहे. या बाईकसाठी देशभरातील Honda BigWing डीलरशिप्सवर बुकिंग सुरू झाले असून जुलै 2025 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून निवेदन
लाँचबद्दल भाष्य करताना, एचएमएसआयचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ त्सुत्सुमु ओटानी, यांनी सांगितले, 'आम्ही भारतात नवीन XL750 Transalp सादर करताना अत्यंत आनंदित आहोत. या बाईकने जगभरातील ॲडव्हेंचर रायडर्सचे मन जिंकले आहे. आधुनिक फीचर्स व कार्यक्षम डिझाइनसह भारतातील बाईकप्रेमींना ही बाईक नक्कीच आवडेल.”
योगेश माथूर, संचालक, विक्री आणि विपणन, HMSI म्हणाले, 'भारताचा ॲडव्हेंचर बाइक मार्केट वेगाने वाढतो आहे. आमच्या सध्याच्या ADV लाईनअपला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आता या नवीन XL750 Transalp मुळे आम्ही ॲडव्हेंचर टूअरिंगचा दर्जा अधिक उंचावणार आहोत. पर्वत बोलावत आहेत – आणि Transalp सज्ज आहे.'
डिझाइन व वैशिष्ट्ये
नवीन XL750 Transalp मध्ये ड्युअल एलईडी प्रोजेक्टर हेडलाईट, ऍरोडायनॅमिक व्हायझर देण्यात आले आहे जे लांब प्रवासात वाऱ्यापासून संरक्षण करते. बाईक Ross White आणि Graphite Black या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या बाईकमध्ये 5.0 इंची फुल-कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यामध्ये सूर्यप्रकाशात देखील उत्तम व्हिजिबिलिटी मिळते. रायडर्ससाठी Honda RoadSync अॅप कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे जी डाव्या हँडलबारवर दिलेल्या बॅकलिट चार-मार्गीय टॉगल स्विचद्वारे ऑपरेट करता येते. यामुळे कॉल, एसएमएस अलर्ट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक आणि व्हॉइस कमांड्स सहज वापरता येतात.
सुरक्षेसाठी Emergency Stop Signal फीचर दिले असून अचानक ब्रेक घेतल्यास मागील वाहनांना इशारा मिळतो. याशिवाय, ऑटोमॅटिक टर्न सिग्नल कॅन्सलिंग फंक्शन देखील आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
या बाईकला 755cc लिक्विड-कूल्ड, पॅरॅलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे जे 67.5 kW @ 9,500 RPM आणि 75 Nm @ 7,250 RPM टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स ला जोडलेले आहे.
रायडर्ससाठी Throttle-By-Wire (TBW) तंत्रज्ञानावर चालणाऱ्या पाच रायडिंग मोड्स – Sport, Standard, Rain, Gravel आणि User – उपलब्ध आहेत. यामध्ये इंजिन पॉवर, ब्रेकिंग, Honda Selectable Torque Control (HSTC), ABS आणि स्लिपर क्लचसारखे पर्याय सानुकूल करता येतात.
या ॲडव्हेंचर बाईकमध्ये 21 इंच फ्रंट आणि 18 इंच रिअर स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. यामध्ये Showa 43mm SFF-CA™ USD फ्रंट फॉर्क्स आणि Pro-Link रिअर शॉक अब्झॉर्बर आहे जे रस्त्यावर तसेच ऑफ-रोड परिस्थितीतही उत्तम कामगिरी करते. XL750 Transalp च्या माध्यमातून Honda ने पुन्हा एकदा भारतीय बाजारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲडव्हेंचर बाईक्स सादर करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला दुजोरा दिला आहे. ही बाईक भारतातील ॲडव्हेंचर रायडिंगप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)