भारतात लॉन्च झाली नवी Honda Civic, जाणून घ्या किंमत आणि खासियत

या सुपर कारची विक्री आजपासून (7 मार्च) पासून सुरु झाली आहे.

Honda Civic 10th Generation (Photo Credits-twitter)

जपान (Japan) कार कंपनी होंडाने (Honda) भारतात आपली नवी कार Honda Civic लॉन्च केली आहे. या सुपर कारची विक्री आजपासून (7 मार्च) पासून सुरु झाली आहे. कंपनीने 2012 रोजी 8th जनरेशन Civic बंद केली होती. त्यानंतर आता 10th जनरेशनचे मॉडेल असणारी होंडा सिविक भारतात लॉन्च केली आहे.

Honda Civic 2019 ची सुरुवाती किंमत 17.69 लाख रुपये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सिविक लाइन अप 170 देशात विक्री केली जाते. कंपनीने जगात आजवर 2,5 करोड सिविक कारची विक्री केली आहे. 46 वर्षांपासून ही कार विक्री केली जात आहे. फक्त 20 दिवसात ही कार खरेदी करण्यासाठी 1100 ग्राहकांनी बुकिंग केली आहे. फर्स्ट जनरेशन सिविक 1972 रोजी लॉन्च झाली होती.

2019 Honda Civic मध्ये खास फीचर्सबाबत बोलायचे झाले तर, टॉप मॉडेलमध्ये 7 इंच टच स्क्रिन इनफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. तर चालकाच्या सीटसाठी 8वे अॅडजेस्टेबल आणि डुअल ऑटोमॅटिक क्लाइमेट कंन्ट्रोल देण्यात आले आहे. रिमोट इंजिन स्टार्टसह इंजिन स्टार्ट स्टॉप बटण देण्यात आले आहे. होंडा सिविक पाच विविध रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. इंटिरिअर हे लेदर आणि प्रीमियम फॅबरिकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.

या सुपर कारच्या इंजिनसाठी दोन ऑप्शन दिले आहेत. त्यामध्ये एक पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी सिविक कार येते. पेट्रोलसाठी 1.8 लीटर iVTEC इंजिन असून 139bhp चे आहे. तसेच 174nm चे टॉर्क जनरेट करु शकणार आहे. त्याचसोबत डिझेल इंजिन असणाऱ्या सिविकसाठी i-DTEC असून 1.6 लीटर डिझेल राहण्याची क्षमता दिली आहे. तर 118bhp, 300Nm टॉर्क जनरेट करु शकणार आहे. या कारसाठी पेट्रोल ऑप्शनसाठी CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशेन देण्यात आले आहे.