Honda CB Hornet 200R: CB Hornet 200R भारतात 27 ऑगस्टला होणार लॉन्च, डुअल चॅनल ABS सह मिळणार पॉवरफुल इंजिन
कंपनी ही बाईक येत्या 27 ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे. होंडा सीबी हॉर्नेट 200 आर यापूर्वी पेक्षा अधिक पॉवरफुल असण्यासह उत्तम फिचर्स आणि नव्या डिझाइनसह मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे.
Honda Motorcycle India ने भारतात त्यांची नवी 200 cc बाईक Honda CB Hornet 200R लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनी ही बाईक येत्या 27 ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे. होंडा सीबी हॉर्नेट 200 आर यापूर्वी पेक्षा अधिक पॉवरफुल असण्यासह उत्तम फिचर्स आणि नव्या डिझाइनसह मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. कंपनीने त्यांची ही नवी बाईक BS6 नॉर्म्सच्या पद्धतीने अपडेट केली नाही आहे. कारण होंडा ती पुढे सुरु ठेवणार नाही आहे. अशातच आता CB Hornet 160R ऐवजी Honda CB Hornet 200R उतरवण्यात येणार आहे.
होंडा सीबी हॉर्नेट 200आर ही एक प्रीमियम कंम्युटर बाईक असून त्यासाठी देण्यात आलेल्या दमदार फिचर्समुळे ती अधिक पॉवरसह येणार आहे. तसेच बाईकच्या लूकसाठी सुद्धा खुप काम करण्यात आले आहे. त्यामुळे ही बाईक अधिक स्पोर्टी आणि स्टाइलिश दिसून येते. होंडा कंपनीची ही पहिली 200 सीसी बाईक आहे. यापूर्वी कंपनीने 200 सीसी सेंगमेंट मधील कोणतीच बाईल लॉन्च केली नव्हती. ही बाईक TVS Apache RTR 200, Bajaj Pulsar NS200, KTM Duke 200, Benelli TNT 200 यांना टक्कर देणारी ठरणार आहे.(Honda Amaze ठरली सर्वाधिक विक्री करण्यात आलेली कार, सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये)
इंजिन आणि पॉवर बद्दल अधिक बोलायचे झाल्यास, होंडा सीबी हॉर्नेट 200 आर मध्ये कंपनीने 199.5 cc इंजिन दिले जाणार आहे. जे 21 ते 23 HP ची मॅक्सिमम पॉवर आणि 18-19 Nm टॉर्क जनरेट करु शकतो. हे इंजिन स्पीड गिअरबॉक्स लैस केला जाऊ शकतो. CB Hornet 200R मध्ये ड्युअल चॅनल ABS दिले जाऊ शकते. ही एक नेक्ड बाईक असून ती ग्रे, ब्लू आणि रेड रंगात उपलब्ध असणार आहे. भारतात या बाईकची सुरुवाती किंमत 1.40 लाख रुपये असू शकते.