Honda Amaze ठरली सर्वाधिक विक्री करण्यात आलेली कार, सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये

या गोष्टी अंदाज अशा पद्धतीने लावला जाऊ शकतो की, जापानची वाहन निर्माता कंपनीची सब-कॉम्पैक्ट सेडान कार Honda Amaze भारतात 4 लाखांहून अधिक जणांच्या पसंतीस पडली आहे.

Honda Amaze (Photo Credits-Twitter)

भारतात एसयुव्ही आणि हॅचबॅकची वाढत्या मागणी दरम्यान सेडान सेगमेंटने आपली जागा कायम टिकवून ठेवली आहे. या गोष्टी अंदाज अशा पद्धतीने लावला जाऊ शकतो की, जापानची वाहन निर्माता कंपनीची सब-कॉम्पैक्ट सेडान कार Honda Amaze भारतात 4 लाखांहून अधिक जणांच्या पसंतीस पडली आहे. नुकच्याच जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये कंपनीने याबद्दलचा खुलासा केला आहे. 2013 मध्ये लॉन्च झाल्यानंतर या कारच्या विक्रीचा आकडा 4 लाखांच्या पार पोहचला आहे. खास गोष्ट म्हणजे खरेदी करणाऱ्या 20 टक्क्यांहून अधिक जणांनी याच्या एएमटी (AMT) वेरियंटचा ऑप्शन निवडला आहे.

जानेवारी 2020 मध्ये जापानची कार निर्माता कंपनीने अमेझचे BS6 कंम्पलाइंट वर्जन उतरवले होते. त्यामध्ये 1.2 लीटर नॅच्युरल अॅस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले होते.जे क्रमश: 110Nm टॉर्कसह 90bhp ची पॉवर आणि 200Nm टॉर्कसह 100bhp ची पॉवर निर्माण करु शकते. मायलेज संदर्भात कंपनीने असा दावा केला आहे की, BS6 पेट्रोल मॉडेल मॅन्युअल गिअरबॉक्सवर ही कार 18.6kmpl चे मायलेज देणार आहे. तर याचा CVT ऑटोमेटिक ट्रान्समिशन 18.3kmpl चे मायलेज देणार आहे. परंतु मायलेजचे हे आकडे बीएस4 वर्जनच्या तुलनेत थोडे कमी आहेत. तर नव्या अमेझच्या डिझेल वर्जनचे मायलेज बद्दल कंपनीने असा दावा केला आहे की, ही मॅन्युअल गिअरबॉक्ससह 24.7kmpl आणि एएमटीवर 21 kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे.(Hyundai Motor ने सुरु केली Freedom Drive, ग्राहकांना कमी किंमतीत सर्विसिंग करता येणार)

कारच्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास सध्या होंडा अमेझच्या पेट्रोल वेरियंटची सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये आहे. तसेच डिझेल मॉडेलची किंमत 7.63 लाख रुपये आहे. भारतीय बाजारात होंडाच्या या कारची टक्कर Maruti Suzuki Dzire, Hyundai Aura, Ford Aspire आणि 2020 Tata Tiago यांच्यासोबत आहे. कार संदर्भात एकूण माहिती द्यायचे झाल्यास मारुतीच्या डिझायरची सुद्धा लोकप्रियता अधिक आहे. पण होंडा अमेझ त्यांच्या स्टायलिंग आणि कंम्फर्टमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. एक सब कॉम्पॅक्ट सेडान असूनही ही फुल सेडान असल्याचे भासवून देते.