Honda Activa 6G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
या अॅक्टिव्हाची सुरुवाती किंमत 63,912 रुपये असून होंडा कंपनीची ही 6 व्या जनरेशनची आहे. या नव्या स्कुटरमध्ये ग्राहकांना दोन वेरियंट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
होंडा कंपनीची अॅक्टिव्हा 6G भारतात आज लॉन्च करण्यात आली आहे. या अॅक्टिव्हाची सुरुवाती किंमत 63,912 रुपये असून होंडा कंपनीची ही 6 व्या जनरेशनची आहे. या नव्या स्कुटरमध्ये ग्राहकांना दोन वेरियंट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अॅक्टिव्हा 6G ची किंमत 5G या मॉडेलपेक्षा 8 हजार रुपयांनी अधिक आहे. मात्र किंमत जरी वाढवली असली तरीही कंपनीने यामध्ये दमदार फिचर्स दिले आहेत. यामध्ये BS6 कम्प्लायंट 109cc चे इंजिन असून BS6 मध्ये अपग्रेड करण्यासोबत कार्बोरेटरऐवजी फ्यूल इंजेक्शन सिस्टम सामील केले आहे.
नव्या अॅक्टिव्हा 6G चे इंजिन 8000rpm वर 7.68 bhp ची पॉवर आणि 5250 rpm वर 8.79 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने असा दावा केला आहे की, अॅक्टिव्हामध्ये जुन्या मॉडेलपेक्षा 10 टक्के अधिक मायलेज ग्राहकांना मिळणार आहे. एकूण मॉडेलच्या लूक बाबत बोलायचे झाल्यास 6जी मध्ये नवे फ्रंट अॅप्रन आणि रिवाइज्ड LED हेडलॅम्पसोबत पाठील बाजूस सुद्धा बदल केला आहे. गाडीच्या बाजूच्या साईड पॅनलमध्ये सुद्धा हलका बदल केला आहे. 5जी सारखाच लूक या नव्या मॉडेलला देण्यात आला आहे.(Bajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु)