Harley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर

रॉयल एनफील्ड ची एन्ट्री लेवल बाइक्स 350 सीसी इतकी इंजिन क्षमता ठेवते. कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार या बाइकची निर्मिती चीनमध्ये केली जाणार आहे.

Harley-Davidson bike Only representative photos | (Photo Credits: Twitter)

भारतीय बाजारात दमदार परफॉर्मन्स बाइक म्हणून प्रसिद्ध असलेल्या Royal Enfield ला आता आणखी एक तितकाच दमदार प्रतिस्पर्धी मिळणार आहे. अमेरिकन वाहन निर्माता कंपनी Harley-Davidson ने 338cc इतकी क्षमता असलेली बाइक लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्ले डेव्हिडसन कंपनीने नुकतीच तशी अधिकृत घोषणाही केली. या बाइकचे वैशिष्ट असे की, हार्ले डेव्हिडसन कंपनीकडून लॉन्च केली जाणारी ही सर्वात स्वस्त बाइक असणार आहे.

या बाइकच्या इंजिन क्षमतेबद्दल बोलायचे तर, Harley-Davidson कंपनीची ही बाइक बाजारात थेट Royal Enfield ला टक्कर देईन. रॉयल एनफील्ड ची एन्ट्री लेवल बाइक्स 350 सीसी इतकी इंजिन क्षमता ठेवते. कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार या बाइकची निर्मिती चीनमध्ये केली जाणार आहे. या बाइकचे उत्पादन चीनमध्ये होणार असले तरी, चीनच्या शेजारील देशांमध्येही या बाइकची विक्री केली जाणार आहे.

चीननंतर दुचाकींची सर्वाधिक विक्री भारतात होते आणि थेट सांगायचे तर Harley-Davidson बाइकचे चाहते भारतात कमी नाहीत. त्यामुळे Harley-Davidson ची बाइक जर स्वस्तात उपलब्ध झाली तर, ती बाजारात कमाल करेल असा विश्वास ऑटो क्षेत्रातील जाणकारांना वाटतो.

प्राप्त माहितीनुसार, ही बाइक बनविण्यासाठी Harley-Davidson कंपनीने चीनी ब्रांड ‘Qianjang Motorcycle’ सोबत करार केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने या बाइकसाठी एक प्रोटोटाइप बाइकचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही बाईक दिसायलाही मॉडर्न नेक्ड बाइकसारखीच दिसते. पण, या बाईकमध्ये तुम्हाला हार्लेच्या क्रुजर लुकची कमतरता भासू शकते. (हेही वाचा, पॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक)

या बाईकमध्ये कंपनीने led हेडलँप, फूल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम, डिस्क ब्रेक यांसारखी अनेक फिचर्स दिली आहेत. याशियाव फ्रंडला अपसाईड डाऊन फॉर्क आणि बॅकला मोनो शॉक सस्पेंशन द्यायचा प्रयोग करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार ही बाइक पहिल्यांदा चीनमध्ये लॉन्च होईल. त्यानंतर चीन शेजारील देशांमध्ये ही बाइक पाहायला मिळेल. ही बाइक 2020 पर्यंत मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif