GoZero Electric Cycle: भारतात लाँच झाली स्वस्त इलेक्ट्रिक सायकल; एकदा चार्ज केल्यानंतर 25 किलोमीटर धावणार; जाणून घ्या किंमत
ब्रिटनची कंपनी गो झिरो (GoZero) ने आपली ई-सायकलची श्रेणी भारतीय बाजारात आणली आहे. ज्याची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही सायकल एकदा चार्ज केल्यानतंर तब्बल 25 कि.मी. धावेल, असा दावा कंपनीने केला आहे.
GoZero Electric Cycle: कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) लोकांना सायकल (Cycle) चे महत्त्व समजले आहे. यामुळेचं पुन्हा एकदा बाजारात सायकल विक्रीला वेग आला. यामुळे परदेशी कंपन्यादेखील भारतात सायकल लाँच करत आहेत. ब्रिटनची कंपनी गो झिरो (GoZero) ने आपली ई-सायकलची श्रेणी भारतीय बाजारात आणली आहे. ज्याची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही सायकल एकदा चार्ज केल्यानतंर तब्बल 25 कि.मी. धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने भारतात या ई-सायकलचे तीन प्रकार लाँच केले आहेत. या सायकलची सर्वात अत्याधुनिक आवृत्तीची किंमत 34,999 रुपये इतकी आहे. Skellig, Skellig Lite आणि Skellig Pro अशी गो झिरोचीच्या तीन मॉडेल्सची नावे आहेत. या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे 19,999 रुपये, 24,999 रुपये आणि 34,999 रुपये आहेत. (हेही वाचा -Kia Sonet चे Big Version येत्या 11 नोव्हेंबरला होणार लॉन्च, मिळणार दमदार फिचर्स)
दरम्यान, गो झिरोच्या स्केलिग आणि स्केलिग प्रो मॉडेल्सचे ऑनलाईन बुकिंग 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजेचं 8 नोव्हेंबरपासून तुम्ही या दोन्ही सायकल बुक करू शकता. त्यानंतर या दोन्ही आवृत्त्या बाजारातदेखील उपलब्ध होतील. तुम्ही 12 नोव्हेंबरपासून अॅमेझॉनवरदेखील तुमची ऑर्डर बुक करू शकता. (वाचा - Tata Altroz XM+ वेरियंट दमदार फिचर्सह लॉन्च, किंमत 6.6 लाख रुपये)
कंपनीच्या दाव्यानुसार, या इलेक्ट्रिक सायकलच्या स्केलिग आणि स्केलिग लाइट मॉडेलचा वेग 25 किमी प्रतितास असेल. या दोन्ही सायकल एकदा चार्ज केल्यानंतर 25 किमी पर्यंत धावण्यास सक्षम असतील. या सायकलमध्ये एनर्ड्राईव्ह 210 वॉट लिथियम बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे.
सायकल रेंज शिवाय कंपनीने अॅक्टिव वियर कॅटेगरीमध्ये 'मेक फिट' सीरिजदेखील लाँच केली आहे. याची ऑनलाइन खरेदी 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यांची वितरण 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. भारतीय बाजारपेठेत या इलेक्ट्रॉनिक सायकलला लोक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)