खुशखबर! महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत

पॉलिसी अंतर्गत, ईव्ही खरेदीदारांना 31 डिसेंबर 2021 पूर्वी वाहन खरेदीवर अर्ली बर्ड बेनिफिट योजनेचा लाभ मिळत होता, जो आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे

Electric Vehicle | (Representational Purpose | PC: Pixabay.com)

निवडक इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) खरेदीदारांसाठी महाराष्ट्र सरकारची अर्ली बर्ड बेनिफिट (Early Bird Benefits) योजना 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना यापूर्वी 31 डिसेंबर 2021 रोजी संपणार होती. या योजनेअंतर्गत, 4-चाकी वाहन विभागातील फक्त दोन मॉडेल्स - Tata Nexon EV आणि Tigor EV ला लाभ मिळत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत या दोन इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर एक लाख रुपयांची सूट दिली जात आहे. यामुळे ईव्ही पॉलिसी अंतर्गत मिळणाऱ्या सवलतींसह एकूण सवलत 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

महाराष्ट्र ईव्ही धोरणांतर्गत, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर वाहनाच्या बॅटरी क्षमतेच्या प्रति किलोवॅटसाठी 5,000 रुपयांचे बेसिक इंसेटिव्ह उपलब्ध आहे. जे जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये दिले जातात. याशिवाय, पॉलिसी अंतर्गत, ईव्ही खरेदीदारांना 31 डिसेंबर 2021 पूर्वी वाहन खरेदीवर अर्ली बर्ड बेनिफिट योजनेचा लाभ मिळत होता, जो आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा अर्थ, Nexon EV च्या पात्र व्हेरियंटच्या खरेदीदारांना 2.5 लाख रुपये (सबसिडी म्हणून 1.5 लाख रुपये आणि अर्ली बर्ड इन्सेंटिव्हसाठी रुपये 1 लाख) सवलत मिळते. (हेही वाचा: सरकारी ताफ्यातील सर्व वाहने इलेक्ट्रिक असतील; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा)

यासह, Tigor EV चे सर्व व्हेरिएंट अनुदानित आहेत आणि आता अतिरिक्त अर्ली बर्ड बेनिफिट्ससह विकले जात आहेत. या योजनेमुळे वाहनांच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. दरम्यान, Tata Nexon EV ला 30.2 kWh लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक मिळतो. ही इलेक्ट्रिक मोटर 127bhp ची मजबूत पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 312 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 16.56 लाख रुपयांपर्यंत जाते.

दुसरीकडे, 2021 Tigor EV 11.99 लाख रुपये, एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे ही बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनली आहे. 2021 Tigor EV ची इलेक्ट्रिक मोटर 73.75 hp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. कार IP67 रेट 26 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते. वेगवान चार्जरने त्याची बॅटरी एका तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif