Electric and Hybrid Cars: पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स पादचाऱ्यांसाठी अधिक धोकादायक; अभ्यासात धक्कादायक खुलासा

अहवालानुसार, इलेक्ट्रिक कार रस्त्यावरून जात असताना आवाज निर्माण करत नाहीत आणि शांतपणे धावतात, त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनाचा आवाज ऐकू येत नाही, ज्यामुळे अपघात होऊ शकतात.

Electric Vehicle | (Representational Purpose | PC: Pixabay.com)

Electric and Hybrid Cars More Dangerous To Pedestrians: सध्या संपूर्ण जग वेगाने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारकडे (Electric and Hybrid Cars) वळत आहे. भारतातही नवनवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च केल्या जात आहेत. परंतु ब्रिटिश रस्ते वाहतूक अपघातांच्या विश्लेषणावर आधारित एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार पादचाऱ्यांसाठी (Pedestrians) जास्त धोकादायक आहेत. ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार, विशेषतः शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने ही जास्त धोकादायक आहेत.

अहवालानुसार, इलेक्ट्रिक कार रस्त्यावरून जात असताना आवाज निर्माण करत नाहीत आणि शांतपणे धावतात, त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनाचा आवाज ऐकू येत नाही, ज्यामुळे अपघात होऊ शकतात. यासह पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड कारचा रस्ता अपघात होण्याची शक्यता दुप्पट असते.

मात्र इलेक्ट्रिक कार अधिक धोकादायक का आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु संशोधकांचे मत आहे की, या गाड्या पादचाऱ्यांससाठी धोकादायक ठरण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. इलेक्ट्रिक कारचे चालक कमी अनुभवी असतात त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आसते. संशोधनात असेही दिसून आले आहे की, पादचारी सामान्यतः गाडी जवळ येण्याचा आवाज ऐकतात आणि धडक टाळण्यासाठी स्वतः खबरदारी घेतात. मात्र इलेक्ट्रिक आणि हायब्रीड मोटारींमध्ये ही शक्यता फार कमी होते.

या अभ्यासासाठी रोड सेफ्टी डेटा वापरून, 2013 आणि 2017 दरम्यान ब्रिटनमधील रस्त्यावरील धडकेमुळे झालेल्या अपघातातील मृतांची संख्या पहिली गेली. तसेच विविध प्रकारच्या कारने धडक बसलेल्या पादचाऱ्यांची संख्या मोजली. या कालावधीत, 96,285 पादचाऱ्यांना कार किंवा टॅक्सीने धडक दिली होती. यापैकी तीन चतुर्थांश लोकांना ज्वलन इंजिन असलेल्या कारने धडक दिली होती, बाकीच्या इलेक्ट्रीक कार्स होत्या. पादचाऱ्यांच्या मृत्यूंपैकी दोन टक्के अपघात इलेक्ट्रिक वाहनामुळे झाले आहेत. (हेही वाचा: New Driving License Rules 2024: येत्या 1 जूनपासून लागू होणार ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम; आता टेस्ट देण्यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही)

इलेक्ट्रीक मोटारींमध्ये कृत्रिम ध्वनी बसवल्यास ते इंधनावर चालणाऱ्या वाहनांप्रमाणेच आवाज करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे केल्याने पादचाऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही कारण त्यांना वाहन जवळ येत असल्याचे अगोदरच काळे. अशा प्रकारे इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषण होत नाही, परंतु त्यात अजूनही काही उणीवा आहेत ज्यांवर काम करणे बाकी आहे. भारतीय हवामानानुसार या वाहनांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.