सिंगल चार्जमध्ये 60 किमीची जबरदस्त रेंज देणार Detel ची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमतीसह खासियत

ज्याची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही देशातील सर्वाधिक स्वस्ती इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

Detel Electric Scooter (Photo Credits-Facebook)

Detel कंपनीने राइड एशिया एक्सपो मध्ये आपली किफायती इलेक्ट्रिक स्कूटर डिटल ईजी प्लस लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही देशातील सर्वाधिक स्वस्ती इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीने या स्कूटरची बुकिंग सुरु केली असून ग्राहकांना ती अधिकृतरित्या वेबसाइटच्या माध्यमातून बुक करता येणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांना 1,999 रुपये मोजावे लागणार आहेत.(सिंगल चार्जमध्ये 375 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम ठरतील भारतातील 'या' इलेक्ट्रिक कार)

डिटेल स्कूटरसाठी कंपनीने 170 मिमीचा ग्राउंड क्लिअरेन्स दिला आहे. जो भारतीय रस्त्यांनुसार डिझाइन करण्यात आला आहे. हे लो-स्पीड वाहन 20Ah लिथियम आयन बॅटरी द्वारे संचलित करण्यात आले आहे. हे वाहन फक्त 4-5 तास फुल चार्ज होणार आहे. तर चार्जिंग केल्यानंतर स्कूटर 60Km चे अंतर कापू शकणार आहे. डिटेल इलेक्ट्रिक स्कूटर अत्यंत हायटेक आहे. यामध्ये मेटल अलॉय, पाउडर-कोटेड आणि ट्युबलेस टायरसह डिझाइन करण्यात आले आहे. जो प्रत्येक प्रकारच्या रस्त्यांसाठी सोईस्कर असणार आहे.(Dual Airbags Compulsory In All New Cars: येत्या 1 एप्रिलपासून कारच्या पुढील दोन्ही सीट्सवर Airbags असणे अनिवार्य)

डिटेल ईजी प्लज 170 किमीचा भार सहन करण्याची सक्षता ठेवते. या व्यतिरिक्त ईजी प्लसमध्ये 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे. जो स्कूटरला 25 किमी प्रति तासचा वेग देणार  आहे. त्याचसोबत डिटेल कंपनी प्रत्येक बाइकसह प्री पेड रोड साइड असिस्टेंटची सुद्धा सुविधा देणार आहे. जर बाइक खराब झाल्यास ग्राहकांना टोल फ्री क्रमांक (844 844 0449) वर संपर्क करता येणार आहे. तेव्हा एक गाडी त्या लोकेशनवर पाठवली जाईल जेथून बाईक 40KM रेडियसच्या आतमध्ये कोणत्याही सर्विस पॉइंटर निशुल्क पाठवली जाणार आहे. बाईकसाठी आरटीओ नोंदणीपासून सूट दिली गेली आहे. त्यामुळे ही चालवण्यासाठी लायसन्सची गरज भासणार नाही आहे.