वाहकांच्या सुरक्षेच्या आता रेट्रो टेप लावणं बंधनकारक; रिक्षा, ई रिक्षा साठी देखील लागू होणार नियम
हा विचार रस्स्ते अपघात टाळण्यासाठी करण्यात येणार आहे.
देशातील रस्ते अपघात आणि त्यामधून होणार्या मृत्यूचे प्रमाण पाहता आता केंद्र सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीमध्ये आहे. आता वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी गाड्यांवर नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावणं गरजेचे आहे. रेट्रो टेप किंवा चमकदार टेप न लावल्यास संबंधित कार चालकावर कारवाई केली जाणार आहे. हा विचार रस्स्ते अपघात टाळण्यासाठी करण्यात येणार आहे.
नंबर प्लेटवर रेट्रो टेप असल्यास रात्री किंवा काळोखामध्येही चमकणार आहे. या टेपमुळे मागे- पुढे असणार्या वाहनांना त्या स्पष्टपणे दिसू शकणार आहेत. पुढील आठवड्याभरात याबाबतच परिपत्रक रस्स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
रस्स्ते वाहतूक मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार ऑटो रिक्षा, ई रिक्षा यांच्यामध्ये पुढील बाजूला सफेद रंगाची आनी मागील बाजूला लाल रंगाची रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप लावणं गरजेचे आहे. या टेपची लांबी 20 मिमी पेक्षा कमी असू नये. गाडीचा वेग 25 किमी प्रति तास असणं आवश्यक आहे. तसेच टेपची चमक 50 मीटर लांबूनही दिसणं आवश्यक आहे. यापूर्वी ई रिक्षाला यामधून वगळण्यात आलं होतं.