BMW R NineT आणि R Nine Scrambler भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत

कंपनीने भारतीय बाजारात आर नाईनटी स्क्रॅम्बलरची एक्स शो रुम किंमत 16.75 लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.

BMW R NineT (Photo Credits-Twitter)

बीएमडब्लू मोटोराड इंडिया यांनी आपली BMW R Nine आणि BMW R NineT Scrambler भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने भारतीय बाजारात आर नाईनटी स्क्रॅम्बलरची एक्स शो रुम किंमत 16.75 लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. तर याच्या आर नाईनटी ची किंमत 18.50 लाख रुपये आहे. या दोन्ही मोटरसायकलची बुकिंग सुरु झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत डिलरशीपवर त्याची बुकिंग करता येणार आहे.या मोटरसायकलमध्ये नियो रेट्रो डिझाइन दिले गेले आहे. यामध्ये नवे डिझाइन करण्यात आलेले सर्कुलर इंस्ट्रुमेंटल कंसोलसह अॅनालॉग स्पीडोमीटर डिस्प्ले आणि इंटीग्रेटेड इंडीकेटर लाइट्स आणि मेटल केसिंग दिली आहे. दोन्ही मॉडेल्स एलईडी हेडलाइट्स आणि डेटाइम रनिंग लाइट्स मध्ये दिली आहे.

पॉवर परफॉर्मेन्स बद्दल बोलायचे झाल्यास या दोन्हीमध्ये 1170 सीसीचे 2 सिलिंडर असणारे एअर/ऑयल कूल्ड इंजिन दिले गेले आहे. यामध्ये लावण्यात आलेले इंजिन 7520 आरपीएमवर 109 bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 6,000 आरपीएमवर 119Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे.उत्तम रायडिंग अनुभवासाठी यामध्ये दोन रायडिंग मोड्स दिले आहे. यामध्ये रोड आणि रेन यांचा समावेश आहे. BMW R NineT आणि BMW R NineT Scrambler मध्ये 200 किमी प्रति तासांची टॉप स्पीड मिळणार आहे. या व्यतिरिक्त मोटरसायकल अवघ्या 3.5 सेकंदात 0-100 किमी प्रति तासांचा वेग पकडणार आहे.(सिंगल चार्जमध्ये 375km ची रेंज देणार XUV 300 Ev, जाणून घ्या खासियत)

रेन मोडमध्ये हलके थ्राटल रिस्पॉन्ससह ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल (ASC) चे सेंसिटिव्ह कंट्रोल मिळणार आहे. जे लो ट्रॅक्शनवर सुरक्षित रायडिंग करण्यास मदत करणार आहेत. तर रोड मोड मध्ये बॅलेन्स थ्रॉटल रिस्पॉन्स मिळणार असून जे सुक्या जागेवर उत्तम रायडिंगचा अनुभव देणार आहे.सुरक्षिततेबद्दल बोलायचे झाल्यास, BMW R NineT आणि BMW R NineT Scrambler मध्ये एबीएस प्रो, डायनमिक ब्रेक कंट्रोल, नवे संस्पेशन स्ट्रटसह ट्रॅव्हल इंडिपेंडट डॅम्पिंग दिले गेले आहे. दोन्ही मोटरसायकलमध्ये विविध कलर ऑप्शन मिळणार आहेत. या व्यतिरिक्त विविध एक्ससरिज सुद्धा दिल्या जाणार आहेत.