ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर
या उद्भवलेल्या आपत्तीचा परिणाम अनेक उद्योगधंद्यावरही होत आहे. शुक्रवारी जगातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असणारी कार फॅक्टरी तात्पुरती बंद झाली
कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या उद्भवलेल्या आपत्तीचा परिणाम अनेक उद्योगधंद्यावरही होत आहे. शुक्रवारी जगातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असणारी कार फॅक्टरी तात्पुरती बंद झाली. दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने (Hyundai) सध्या आपल्या सर्वात मोठ्या उलासन प्लांटचे काम बंद केले आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम होत आहे. याच कारणामुळे सध्या बाजारात ऑटो पार्ट्सची कमतरता आहे. ह्युंदाई या प्लांटमध्ये वर्षाकाठी 1.4 दशलक्ष वाहने तयार करण्याची क्षमता आहे. ही कंपनी समुद्रकिनारी आहे, त्यामुळे सहजपणे घटक आयात आणि निर्यात केले जाऊ शकतात. मात्र आता हा प्लांट बंद करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी चीनने कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे, चीनमध्ये उत्पादित घटकांवर अवलंबून असलेल्या उद्योगांना आपले कार्य चालू ठेवणे कठीण जात आहे. ह्युंदाईकडे वाहनांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडणार्या वस्तूंची कमतरता आहे. यामुळे दक्षिण कोरियामधील ह्युंदाईसह इतर कंपन्यांनी सध्या उत्पादन बंद केल्या आहेत. केवळ दक्षिण कोरियामध्ये या कारणासाठी सुमारे 25 हजार कामगारांना सक्तीने रजेवर पाठविले गेले आहे.
चीनबाहेरील कारखाने बंद पडण्याचे हे पहिले उदाहरण असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, या गोष्टीचा ह्युंदाईवर गंभीर परिणाम होणार आहे. पाच दिवस प्लांट बंद ठेवल्याने अंदाजे 600 अरब वॉन म्हणजे 50 कोटींचे नुकसान होईल. ह्युंदाईची सहायक कंपनी किआ मोटर्सनेही सोमवारी तीन प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेनॉल्टची दक्षिण कोरियाची सहाय्यक कंपनी बुसान प्लांट पुढील आठवड्यात बंद होणार आहे. ही फक्त एक सुरुवात आहे. हे संकट ऑटोमोबाईल क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातहीही पसरेल. (हेही वाचा: यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, Mahindra eKUV100 लाँच)
दरम्यान, चीन जागतिक उत्पादन पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनला आहे आणि जागतिक उत्पादनात त्याचा 20 टक्के वाटा आहे.