Bajaj CNG Bike Freedom 125: बजाजने लाँच केली जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम 125; जाणून घ्या किंमत व फीचर्स
वाहन उद्योगाने आतापर्यंत 4 कोटी रोजगार निर्माण केले आहेत.
मध्यमवर्गीय भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून बजाजने ही मोटरसायकल डिझाइन केली आहे. ग्राहक आजपासून देशातील कोणत्याही बजाज शोरूममधून ही बाइक बुक करू शकतील. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत फ्रीडम 125 सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे.
बजाजने फ्रीडम 125 सीएनजी बाईक 95 हजार रुपयांपासून लॉन्च केली आहे, ज्याची कमाल किंमत 1.10 लाख रुपये आहे. ही मोटरसायकल तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यातील NG04 Drum प्रकाराची किंमत 95,000 रुपये आहे, तर NG04 Drum LED ची किंमत 1.05 लाख रुपये आहे. याशिवाय, तिसरा व्हेरिएंट NG04 Disc LED ची किंमत 1.10 लाख रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
बजाज फ्रीडम 125cc सिंगल-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे, जे पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही इंधनावर चालते. सीटखाली सीएनजी टाकी दिली आहे. या बाईकमध्ये 2 किलो वजनाची सीएनजी टाकी आणि 2 लीटरची पेट्रोल टाकी बसवण्यात आली आहे. इंजिन 9.5 PS आणि 9.7 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय, कंपनी 300 किलोमीटरची रेंज ऑफर करते. बजाज ऑटोच्या पहिल्या सीएनजी मोटारसायकलचा लूक आणि फीचर्स याविषयी नेमकी माहिती लॉन्च झाल्यानंतरच कळेल, परंतु आतापर्यंत समोर आलेल्या सर्व माहितीनुसार यात एलईडी लाईट्स, सिंगल पीस सीट सेटअप, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, युएसबी चार्जिंग पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स आढळू शकतात. (हेही वाचा: BMW Sales Increased In India:2024 च्या पहिल्या सहामाहीत BMW Group India ची भारतात आतापर्यंतची सर्वाधिक कमाई; 7,098 युनिट्सची विक्री)
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अमेरिका आणि जपाननंतर भारत हा जगातील तिसरा मोठा ऑटोमोबाईल उद्योग बनला आहे. वाहन उद्योगाने आतापर्यंत 4 कोटी रोजगार निर्माण केले आहेत. दुचाकी उद्योग उत्कृष्ट काम करत आहे. 5 वर्षांच्या आत, भारत जगातील दुसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उद्योग असेल.