Auto Expo 2020: यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, Mahindra eKUV100 लाँच; मार्चपासून बुकिंग, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
ऑटो एक्सपो 2020 (Auto Expo 2020) च्या पहिल्या दिवशी महिंद्राने (Mahindra & Mahindra), महिंद्रा ईकेयूव्ही 100 (eKUV100) गाडीला बाजारात आणले आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून
ऑटो एक्सपो 2020 (Auto Expo 2020) च्या पहिल्या दिवशी महिंद्राने (Mahindra & Mahindra), महिंद्रा ईकेयूव्ही 100 (eKUV100) गाडीला बाजारात आणले आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून, त्याची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपये आहे. ऑटो एक्सपो 2018 मध्ये टाटाने या कारची संकल्पना दर्शविली होती, त्यानंतर कंपनीने आपल्या उत्पादनामध्ये बराच वेळ व्यतीत केला. लुकचा विचार कराल तर महिंद्रा ईकेयूव्ही 100 त्याच्या पेट्रोल व्हर्जनसारखीच आहे. कारच्या प्रॉडक्शन मॉडेलमध्येही फारसा बदल होणार नाही असा अंदाज आहे. कारला शक्यतो वेगळ्या प्रकारचे ग्रिल आणि त्याऐवजी हेडलॅम्प्स आणि टेललाईट्स प्रदान केल्या जातील.
महिंद्रा ऑटोमोटिव्ह कारचे आतील भाग फार बदलणार नाही, परंतु डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलऐवजी या इलेक्ट्रिक कारसह मोठ्या इंफोटेनमेंट सिस्टम प्रदान करता येईल असा अंदाज आहे. महिंद्राच्या नवीन ईकेयूव्ही 100 मध्ये 40 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर बसविण्यात आली असून, त्यामध्ये 53 बीएचपी पॉवर आणि 120 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. कारसह सिंगल-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध केले जाईल, जे कारच्या पुढील चाकांना पॉवर पुरवेल. कारमध्ये 15.9 किलोवॅट क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरी बसविण्यात आली आहे जी संभाव्यपणे एकदा चार्ज कल्यावर 120 किमी पर्यंत धावू शकते. (हेही वाचा: भारतात नुकतेच लॉंंच झालेली MG Hector ने महिन्याभरात दुसऱ्यांदा घेतला पेट; कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही (Video)
महिंद्रा ईकेयूव्ही 100 सह, सामान्य आणि फास्ट चार्जरचा पर्याय प्रदान करू शकते. महिंद्राची ही इलेक्ट्रिक कार लॉन्चिंगच्या वेळी भारतातील सर्वात कमी किंमतीची इलेक्ट्रिक वाहन बनली आहे. याशिवाय राज्य सरकारने राबविलेल्या धोरणांनुसार या इलेक्ट्रिक केयूव्ही 100 ची किंमत आणखी कमी होणार आहे. या कारचे बुकिंग मार्चपासून सुरू होणार असून एप्रिलपासून वितरण सुरू होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)