New Audi Q3 बाजारात दाखल, बुकिंग सुरू; पहा आलिशान कारचे खास फोटो आणि व्हिडिओ
ऑडी इंडियाने ऑल-न्यू Audi Q3 चे अधिकृत बुकिंग १ लाख रुपयांच्या टोकन रकमेवर सुरू केले आहे. २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि क्वाट्रो ऑल-व्हील ड्राईव्हसह येणाऱ्या या लक्झरी एसयूव्हीचे बुकिंग ऑनलाइन व डीलरशिपवर उपलब्ध आहे.
लक्झरी कार खरेदीदारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतीय बाजारात आपल्या बहुप्रतिक्षित 'ऑल-न्यू ऑडी क्यू३' (Audi Q3) या प्रिमियम एसयूव्हीचे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे. आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्सचा समतोल साधत ही एसयूव्ही पुन्हा एकदा बाजारात दाखल होत आहे.
१ लाख रुपयांत बुकिंगची सुविधा
ग्राहक ही लक्झरी एसयूव्ही १,००,००० रुपयांच्या सुरुवातीच्या टोकन रकमेवर बुक करू शकतात. ही बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोयीस्कर ठेवण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक ऑडी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर, 'मायऑडी कनेक्ट' (myAudi Connect) मोबाइल ॲप्लिकेशनवर किंवा जवळच्या कोणत्याही अधिकृत ऑडी डीलरशिपवर जाऊन ही कार बुक करू शकतात.
दमदार २.०-लिटर इंजिन आणि क्वाट्रो तंत्रज्ञान
परफॉर्मन्सचा विचार केल्यास ऑल-न्यू Audi Q3 मध्ये ताकदवान २.०-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनसोबत ऑडीचे जगप्रसिद्ध 'क्वाट्रो' (Quattro) ऑल-व्हील ड्राईव्ह तंत्रज्ञान जोडले गेले आहे. यामुळे खडतर रस्ते असोत वा हायवे, सर्व प्रकारच्या प्रवासात वाहनावरील नियंत्रण आणि स्थिरता उत्कृष्ट राहण्यास मदत होते. याशिवाय या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिली जाणारी अनेक प्रगत वैशिष्ट्ये या कारमध्ये समाविष्ट आहेत.
आधुनिक जीवनशैली आणि सुरक्षिततेचा मेळ
नवीन जनरेशनची ही एसयूव्ही दैनंदिन प्रवासासाठी जेवढी उपयुक्त आहे, तेवढीच ती हायवेवर डायनॅमिक ड्रायव्हिंगचा अनुभव देते. आकर्षक आणि स्पोर्टी एक्सटीरियर डिझाइन, आलिशान केबिन, अद्ययावत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली आणि अत्याधुनिक ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्समुळे ही कार ग्राहकांच्या जीवनशैलीशी सुसंगत ठरते.
ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लों यांनी सांगितले की, "ऑल-न्यू क्यू३ चे बुकिंग सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ही कार आकर्षक डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्सचा उत्तम संगम आहे. ग्राहकांमध्ये या मॉडेलबद्दल मोठी उत्सुकता असून, भारतातील आमचा एसयूव्ही पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे बुकिंग सुरू होणे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे."