17 वर्षांपूर्वी लॉन्च केलेल्या Honda Brio कारचे उत्पादन भारतात बंद
जपानची कार निर्माता कंपनी होंडा आता भारतातील हॅचबॅक कार ब्रियोचे उत्पादन बंद करणार आहे.
जपानची (Japan) कार निर्माता कंपनी होंडा आता भारतातील हॅचबॅक कार ब्रियोचे (Honda Brio) उत्पादन बंद करणार आहे. होंडाने सुमारे 17 वर्षांपूर्वी हे मॉडल भारतीय बाजारात सादर केले होते. कंपनीची नवी कार कॉम्पॅक्ट सेडान अमेझ (Compact Sedan amaze) ची विक्री वाढवण्यासाठी होंडा कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टाटांचा नॅनो कारला टाटा; 2020 पासून उत्पादन होणार बंद
अमेझ भारतीय बाजारातील सर्वात कमी किंमतीची कार आहे. होंडा कार्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि निर्देशक राजेश गोयल (Rajesh Goyal) यांनी सांगितले की, "आता आमची सर्वात कमी किंमतीची कार अमेझ आहे. आम्ही ब्रियोचे उत्पादन बंद केले आहे आणि सध्या तरी ब्रियोचे कोणतेही नवे वेरिएंट बाजारात आणण्याचा आमचा विचार नाही. ग्राहक देखील अलीकडे बड्या मॉडल्सला पसंती देत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही अशीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षी सेडानची विक्री सर्वाधिक झाली. अधिक विकसित कार्स स्वीकारुन त्या वापरण्याची वृत्ती भारतात कमी वेगाने विकसित होत आहे. कारण सेडानची सर्वाधिक विक्रीचे चित्र भारतात 6-7 वर्षांपूर्वी दिसायला हवे होते."
तसंच ते पुढे म्हणाले की, "जॅज आणि डब्ल्यूआर-वी हे दोन वेगळे मॉडल्स असून ते लहान कार्सची गरज पूर्ण करतात. होंडाने सप्टेंबर 2001 मध्ये ब्रियो भारतात लॉन्च केली होती. आतापर्यंत ब्रियोच्या 97,000 कार्सची विक्री झाली आहे."