2021 Royal Enfield Classic 350 दमदार डिझाइनमध्ये लॉन्च, मिळणार 'हे' दमदार फिचर्स

ही मोटरसायकल बहुतांश वेळा टेस्टिंग दरम्यान स्पॉट करण्यात आली आहे. तर आता आपली टेस्टिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या लॉन्चिंगसाठी खुप कमी अवधी शिल्लक आहे.

Royal Enfield (Photo Credit: Royalenfield.com)

2021 Royal Enfield Classic 350 भारतात लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही मोटरसायकल बहुतांश वेळा टेस्टिंग दरम्यान स्पॉट करण्यात आली आहे. तर आता आपली टेस्टिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या लॉन्चिंगसाठी खुप कमी अवधी शिल्लक आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोटरसायकलमध्ये अॅडवेंचरची आवड असलेल्यांच्या दृष्टीकोनातून ही तयार करण्यात आली आहे. त्यानंतर आता यामध्ये आधीपेक्षा अधिक सामान वाहून घेऊन जाता येणार आहे.(Xiaomi घेऊन येणार हाय रेंज मधील इलेक्ट्रिक वाहन, 'या' कंपनीच्या फॅक्ट्रीत तयार केली जाणार)

कंपनीची ही नवी बाईक J1-349 मोटप प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. 2021 रॉयल इन्फिल्ड क्लासिक 350 सध्याच्या मॉडेल सारखीच दिसते. याच्या टँकचा आकार, पायाच्या येथे फेंडर आणि साइड पॅनल हा सध्याच्या मॉडेल सारखा दिला जाणार आहे. जर तुम्ही जवळून पाहिल्यास यामध्ये काही महत्वाचे अपडेट्स सुद्धा करण्यात आले आहेत. या मोटरसायकल मध्ये Meteor 350 सारखे डिझाइन एलिमेंट्स पहायला मिळू शकतात.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 2021 रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 मध्ये पुशोडर वॉल्व सिस्टिमच्या जागी SOHC सेटअप दिला जाणार आहे. इंजिन आता सुद्धा एअर कू्ल्ड असणार असून ते ठंड करण्यासाठी सिलेंडर हेडच्या आतमध्ये एक अतिरिक्त आंतरिक तेल सर्किटची सुविधा सुद्धा मिळणारआहे. हे इंजिन कंपनी 20.2bhp ची पॉवर आणि 24 पीक टॉर्क जनरेटसाठी मदत करणार आहे. त्याचसोबत क्लासिक 350 मध्ये 5 स्पीड गिअरबॉक्सच्या रुपात उपलब्ध असणार आहे.(2021 Kawasaki Ninja 300 भारतात लॉन्च, किंमत 3.18 लाख रुपये)

दरम्यान, कंपनीच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या बाईकच्या अंतर्गत नवी 2021 रॉयल इन्फिल्ड क्लासिक 350 सुद्धा ट्रिपर नेविगेशन मध्ये सहभागी होणार आहे. याचे दोन पार्ट्स असे आहेत ज्यामध्ये डेडिकेटेड डिस्प्ले असून ज्यावर तुम्ही टर्न बाय टर्न नेविगेशन पाहू शकता. तर दुसरा रॉयल इन्फिल्ड मोबाईल अॅप आहे. तुम्ही स्मार्टफोनवरील ब्लुटुथच्या मदतीने 2021 रॉयल इन्फिल्ड क्लासिक सोबत कनेक्ट करु शकता. आता अॅपमध्ये जाऊन तुमचे लोकेशन सेट करावे लागणार आहे. त्यानंतर ट्रिपर तुम्हाला 2021 रॉयल इन्फिल्ड क्लासिक 350 डेडिकेटेड डिस्प्ले टर्न बाय टर्न नेविगेशन दाखवणार आहे.