पुढच्या वर्षीपासून बंद होऊ शकतात Alto 80 आणि Hyundai i20 सारख्या 17 लोकप्रिय कार्स; जाणून घ्या कारण
आतापर्यंत प्रयोगशाळेत वाहनांच्या उत्सर्जन पातळीची चाचणी केली जात होती. यातील सर्वात मोठी समस्या ही होती की, जेव्हा वाहन रियल लाईफ कंडीशनमध्ये वापरले जात असे, तेव्हा त्याची उत्सर्जन पातळी वाढत असे.
जर तुम्ही येत्या नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी ठरू शकते. याआधी बातमी आली होती की, प्रमुख कार कंपन्यांनी जानेवारी 2023 पासून सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता, अहवाल सूचित करतात की अनेक ऑटो निर्मात्यांद्वारे ऑफर केलेल्या 17 कार एप्रिल 2023 पासून बंद केल्या जाऊ शकतात. याचे कारण म्हणजे रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नॉर्म्स नावाचे उत्सर्जन नियम पुढील वर्षी एप्रिलपासून देशात लागू होणार आहेत.
या नियमामुळे अनेक कार्स रस्त्यावरून हटवल्या जाऊ शकतात, मात्र त्यावरील उपाय म्हणजे कंपन्या या कार अपग्रेड करू शकतात. परंतु त्यानंतर अशा कार्सच्या किंमती अजून वाढतील. आरडीई म्हणजे, रिअल-टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करण्यासाठी वाहनांमध्ये आता ऑनबोर्ड सेल्फ-डायग्नोस्टिक डिव्हाइस बसवले जाईल. उत्सर्जनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी हे उपकरण कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर सारख्या प्रमुख भागांचे सतत निरीक्षण करेल.
आतापर्यंत प्रयोगशाळेत वाहनांच्या उत्सर्जन पातळीची चाचणी केली जात होती. यातील सर्वात मोठी समस्या ही होती की, जेव्हा वाहन रियल लाईफ कंडीशनमध्ये वापरले जात असे, तेव्हा त्याची उत्सर्जन पातळी वाढत असे. अशा परिस्थितीत उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करण्यासाठी सरकारने आता प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये हे उपकरण बसवणे बंधनकारक केले आहे.
यासोबतच थ्रॉटल, क्रँकशाफ्टची स्थिती, हवेचा दाब, इंजिनचे तापमान आणि एक्झॉस्ट उत्सर्जन सामग्री (पार्टिक्युलेट मॅटर, नायट्रोजन ऑक्साईड्स, CO2, सल्फर) इत्यादींचे निरीक्षण करण्यासाठी वाहनाने वापरलेले सेमीकंडक्टर देखील अपग्रेड केले पाहिजे, असे सरकारने सांगितले आहे. याशिवाय, इंधन जाळण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी वाहनांमध्ये प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्टर देखील असतील. (हेही वाचा: केरळ मध्ये Ford Classic Diesel कार जाहिरातीमध्ये दाखवण्यानुसार मायलेज देत नसल्याने ग्राहकाला मिळाली 3 लाखांची नुकसान भरपाई)
या नियमांमुळे पुढील वर्षापासून बंद होणार्या कारमध्ये, Skoda Octavia, Skoda Superb, Renault Kwid 800, Nissan Kicks, Maruti Suzuki Alto 800, Tata Altroz Diesel, Mahindra Marazzo, Mahindra Alturas G4, Mahindra KUV100, Toyota Innova Crysta Petrol, Hyundai i20 Diesel, Hyundai Verna Diesel, Honda City 4th Gen, Honda City 5th Gen Diesel, Honda Amaze Diesel, Honda Jazz, Honda WR-V यांचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)