Tatyana Ozolina Accident: जगातील 'सर्वात सुंदर महिला बाइकर'चा मृत्यू, BMW दुचाकी चालवताना झाला अपघात

रशियाची प्रसिध्द तात्याना ओझोलिना हीचं अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तात्याना ओझोलिना ही तिच्या सौदर्यांसाठी आणि बाइक्सच्या आवडीसाठी प्रसिध्द होती.

Tatyana Ozolina Accident: जगातील 'सर्वात सुंदर महिला बाइकर'चा मृत्यू, BMW दुचाकी चालवताना झाला अपघात
Tatyana Ozolina Accident: PC TW

Tatyana Ozolina Accident: रशियाची प्रसिध्द तात्याना ओझोलिना हीचं अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तात्याना ओझोलिना ही तिच्या सौदर्यांसाठी आणि बाइक्सच्या आवडीसाठी प्रसिध्द होती. सुट्टींसाठी ती तुर्कियेला होती त्यावेळीस BMW बाईक चालवत असताना तिचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की, यात तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- काठमांडू विमानतळावरील अपघातामध्ये 15 मृतदेह हाती; Nepal Police ची माहिती)

मिळालेल्या माहितीनुसार, तात्याना ओझोलिना BMW बाईक चालवतना तीचं नियंत्रण सुटले आणि मिलासजवळ एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती, ती गंभीर जखमी झाली तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तात्याना सोबत बाईक चालवणारा स्थानिक तुर्कीचा बाईकर ओनुर ओबुत हा अपघातातून वाचला पण तो गंभीर जखमी झाला सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित तिसरा दुचाकीस्वार सुखरुप आहे. सोशल मीडियावर तात्यानाचा चाहता वर्ग खुप मोठा आहे.

अपघाती मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहली आहे. तात्यानाला २०२३ मध्ये मोटोब्लॉगल ऑप द इयर आणि एप्रिल २०२४ मध्ये किकस्टार्टरद्वारे ट्रॅव्हल ब्लॉगल ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले.  38 वर्षीय तात्याना ओझोलिनाला रशियातील सर्वात सुंदर बाइकर घोषित करण्यात आले होती. तिचे सोशल मीडियावर 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).