World War III: युक्रेन NATO मध्ये सामील झाल्यास होऊ शकते तिसरे महायुद्ध; रशियाचा इशारा

रशियाच्या भीषण हल्ल्यांची मालिका सुरूच असून इराणच्या आत्मघाती ड्रोनने राजधानी कीवला लक्ष्य केले आहे.

Vladimir Putin | (Photo Credits: Facebook)

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सात महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या हल्ल्यानंतर रशियाने आपली रणनीती बदलत युक्रेनवर भडिमार केला आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. या दरम्यान, रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या एका अधिकाऱ्याच्या एका वक्तव्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युक्रेनचा नाटोमध्ये (NATO) समावेश केल्यास तिसरे महायुद्ध भडकू शकते, अशी धमकी आता रशियाने दिली आहे. अशाप्रकारे नाटो सदस्यत्वावरून रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढत आहे.

रशियाने 100 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांनंतर युक्रेनने नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला आहे. रशियाच्या भीषण हल्ल्यांची मालिका सुरूच असून इराणच्या आत्मघाती ड्रोनने राजधानी कीवला लक्ष्य केले आहे. याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रत्येक शस्त्राचा वापर करण्याची धमकी देऊन अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.

त्यात आता रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह म्हणाले, ‘युक्रेनला याची पूर्ण जाणीव आहे की त्यांच्या नाटोमध्ये सहभागी होण्याच्या हालचालीमुळे तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल.’ युक्रेनला मदत केल्याने पाश्चात्य देश या संघर्षाचा थेट भाग असल्याचे दिसून येते, असे रशियाचे मत आहे, असेही ते म्हणाले. अलेक्झांडर वेनेडिक्टोव्हची धमकी अशा वेळी आली आहे जेव्हा, संयुक्त राष्ट्र महासभेत युक्रेनचा भूभाग रशियाने जोडून घेणे 'बेकायदेशीर' आहे, असा ठराव मंजूर झाला आहे. (हेही वाचा: Burqa Ban: 'या' देशात चालू आहे बुरख्यावर बंदी घालण्याची तयारी; कायदा मोडल्यास होऊ शकतो हजारो डॉलरचा दंड)

दरम्यान, नाटो देशांनी युक्रेनला अधिक लष्करी मदत आणि हवाई संरक्षण यंत्रणा पुरविण्याची घोषणा केली आहे जेणेकरून ते रशियन हल्ल्यांना तोंड देऊ शकेल. असेही बोलले जात आहे की, अमेरिका युक्रेनला आपली पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देऊ शकते, जी त्याने तैवानलाही दिली आहे. युक्रेनमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, देशाचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी मॉस्कोवर नवीन निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. युक्रेनमधील घडामोडींवर मंगळवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत जी-7 नेत्यांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही या स्पष्ट वस्तुस्थितीवरही झेलेन्स्की यांनी भर दिला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif