IPL Auction 2025 Live

World Population Forecast For 2100: 21 व्या शतकाच्या शेवटापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोक्संख्येचा देश राहणार; पहा किती असेल लोकसंख्या

मार्चमध्ये भारत अधिकृतपणे चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.

Population | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

जगात वाढती लोकसंख्या अनेक समस्यांना निर्माण करत आहे. यामध्ये वाढती संख्या, स्त्रोतांवर येणारा भार, पर्यावरणाचा ऱ्हास या सार्‍यांचा समावेश आहे. लोकसंख्या वाढीला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यामध्ये आयुमर्यादेमधील वाढ, मृत्यूदर कमी होणं, फॅमिली प्लॅनिंग बाबत सजगता नसणं, सांस्कृतिक, धार्मिक रूढी परंपरा आणि वाढता जन्मदर. दरम्यान लोकसंख्या नियंत्रणाबाबत अपुरे शिक्षण आणि जागरूकता आणि गरिबी आणि महिलांसाठी संधींचा अभाव यासारख्या सामाजिक-आर्थिक घटकांमुळेही ही समस्या उद्भवते. ही समस्या कुटुंब नियोजन, शिक्षण आणि आरोग्यसेवा तसेच शाश्वत विकास पद्धतींमध्ये प्रभावी उपायांची मागणी करते. 21 व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीपासून 18 महिने आपण पुढे आलो आहोत आणि जगाची लोकसंख्या आधीच 8 अब्जांच्या पुढे गेली आहे.

वर्ष 2100 पर्यंत लोकसंख्या 10.4 अब्ज पार करणे अपेक्षित आहे. मार्चमध्ये भारत अधिकृतपणे चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढणे आणि गेल्या वर्षी 1.426 अब्जांपर्यंत पोहोचल्यानंतर चीनच्या लोकसंख्येमध्ये झालेली घसरण या दोन्ही गोष्टींमुळे चीनला भारताचे स्थान मिळाले. UN लोकसंख्या विभागानुसार 21 व्या शतकाच्या अखेरीस सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांवर एक नजर टाकू. (काळजी घ्या! 2035 पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या असेल 'या' आजाराने ग्रस्त; समोर आला धक्कादायक अहवाल).

21 व्या शतकाच्या शेवटपर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश कोणते?

भारत

भारताची लोकसंख्या मार्च महिन्याच्या शेवटाला 1,425,775,850 पर्यंत पोहचली होती. यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या यादीमध्ये भारताने चीनवर मात केली आहे. यूएन च्या माहितीनुसार, 2000 मध्ये भारताची लोकसंख्या 100 million च्या पार गेली आहे. अंदाजानुसार, लोकसंख्या 1533 मिलियन आहे.

चीन

चीन मध्येही लोकसंख्येचा प्रश्न आहे. सध्या चीनची लोकसंख्या 1.412 billion आहे. 2000 मध्ये त्यांची लोकसंख्या 1,295.33 million होती. 2100 च्या शेवटापर्यंत आता ती 771 मिलियन होण्याची शक्यता आहे.

नायजेरिया

नायजेरियाची सध्याची लोकसंख्या 221,168,109 आहे. 2000 मध्ये या आफ्रिकन देशाची लोकसंख्या 122.9 million होती. UN Population Division नुसार, 2100 पर्यंत ही लोकसंख्या 546 million असणार आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानची लोकसंख्या 233,515,417 आहे. 2000 मध्ये ती 15.44 million होती. पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला पाचवा देश आहे. 2100 पर्यंत तो 487 मिलियन लोकसंख्येसह चौथ्या स्थानापर्यंत पोहचू शकणार आहे.

कॉंगो

DR Congo ची लोकसंख्या 97,574,097 आहे. 2024 पर्यंत ही लोकसंख्या 19 कोटीचा टप्पा पार करेल. 2000 मध्ये या सेंट्रल आफ्रिकन देशाची लोकसंख्या 48.6 मिलियन असणार आहे. UN नुसार, 21च्या शतकापर्यंत ही लोकसंख्या वाढून 431 मिलियन होणार आहे.

अमेरिका

अमेरिका हा देश 336,708,490 लोकसंख्येचा आहे. 2000 मध्ये त्यांची लोकसंख्या 282.2 million आहे. 21 व्या शतकाच्या शेवटापर्यंत तो सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीतील पाचवा देश बनणार आहे. तेव्हा अंदाजे त्यांची लोकसंख्या 394 मिलीयन असणार आहे.

इथिओपिया

इथिओपियाची लोकसंख्या 123,347,685 आहे. 2.6% च्या ग्रोथ रेटने त्यांची लोकसंख्या वाढत आहे. 2000 मध्ये त्यांची लोकसंख्या 65 मिलियन होती. युएन च्या अंदाजानुसार त्यांची लोकसंख्या 323 मिलियन पर्यंत जाईल.

इंडोनेशिया

इंडोनेशियाची लोकसंख्या 282,022,033 आहे. त्यांचा ग्रोथ रेट 0.7% आहे. त्यांची या देशाची लोकसंख्या 214.1 मिलियन वरून या शतकाच्या अखेरीस 297 मिलियन असण्याची शक्यता आहे.

टांझानिया

टांझानियाची सध्याची लोकसंख्या 64,745,038 आहे. 2000 मध्ये 34 मिलियन लोकसंख्या असलेला हा देश 2100 पर्यंत 244 मिलियन लोकसंख्येचा होणार आहे.

इजिप्त

इजिप्तची लोकसंख्या 205 मिलियन होण्याचा अंदाज आहे. सध्या 109.3 मिलियन लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये दुपट्टीने लोकसंख्या वाढण्याचा अंदाज आहे. 2000 मध्ये त्याची लोकसंख्या 71.4 मिलियन होती.

या दहा देशांव्यतिरिक्त UN Population Division च्या अंदाजानुसार, 2100 पर्यंत, ब्राझीलची लोकसंख्या 185 दशलक्ष, मेक्सिकोची 116 दशलक्ष, रशियाची 112 दशलक्ष, अफगाणिस्तानची 110 दशलक्ष, तुर्कीची 82 दशलक्ष, यूकेची 70 दशलक्ष, जर्मनीची 68 दशलक्ष, फ्रान्सची 60 दशलक्ष, कॅनडाची 53 दशलक्ष, सौदी अरेबियाची 53 दशलक्ष, सौदी अरेबियाची 50 दशलक्ष आणि ऑस्ट्रेलियाचे 38 दशलक्ष होणार आहे.