पॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार

नुकतेच फ्रान्स (France) मधील सर्वात जुने, जगप्रसिद्ध, पर्यटकांचे आकर्षण असणारे नोट्र डेम कॅथेड्रल चर्च (Notre Dame Cathedral Church) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र येत्या पाच वर्षांमध्ये हे चर्च अधिक सुंदर रीतीने परत उभा करण्याचा निर्धार फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी व्यक्त केला.

Notre Dame Cathedral on fire in central Paris, capital of France. (Photo Credits: Xinhua/Alexandre Karmen/IANS)

नुकतेच फ्रान्स (France) मधील सर्वात जुने, जगप्रसिद्ध, पर्यटकांचे आकर्षण असणारे नोट्र डेम कॅथेड्रल चर्च (Notre Dame Cathedral Church) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. देशाची शान असणारे हे चर्च तब्बल 850 वर्षे जुने होते. फ्रेंच गॉथिक कॅथेड्रल या वास्तूरचनेचा एक अद्भूत नमुना म्हणून या चर्चकडे पाहिले जायचे. या घटनेमुळे देशाची झालेली हानी भरून काढणे अवघड आहे, मात्र येत्या पाच वर्षांमध्ये हे चर्च अधिक सुंदर रीतीने परत उभा करण्याचा निर्धार फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी व्यक्त केला.

ही आग नक्की कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. या चर्चमध्ये नुतनीकरणाचे काम चालू होते, त्यामुळेच ही आग लागली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही आग इतकी भयानक होती की, यामुळे चर्चचे छप्पर आणि मनोरा पूर्णतः जाळून खाक झाले, आता फक्त चर्चच्या भिंती उभा आहेत. तब्बल 12 तास ही आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते, तरी या चर्चला वाचवण्यात यश आले नाही. या चर्चच्या पुनर्बांधणीसाठी दशके लागतील असे तज्ज्ञांनी म्हटले होते, त्यावर मॅक्रॉन यांनी फक्त पाच वर्षांमध्ये हे चर्च पुन्हा सुंदररित्या उभे राहील असे म्हटले आहे. (हेही वाचा: 300 धर्मगुरूंनी केले एक हजारहून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण; चर्चसमोरील गंभीर समस्या)

1163 ते 1345 या दरम्यान या चर्चची स्थापना करण्यात आली होती. या आगीत अनेक कलाकृती व तैलचित्रे हरवली आहेत. सुमारे 8 हजार पाईप असलेल्या मुख्य ऑर्गनचेही नुकसान झाले आहे. मात्र, चर्चच्या भिंती, घंटा असलेले टॉवर आणि प्रख्यात असलेल्या स्टेन्ड-ग्लासच्या खिडक्या शाबूत आहेत. चर्च पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आतापर्यंत 700 अब्ज युरोंची (790 अब्ज अमेरिकी डॉलर) मदत जाहीर झाली आहे. तसेच युनेस्कोदेखील यासाठी मदत करणार आहे.

दरम्यान, इंग्लंडच्या हेन्री (सहावे) यांचा 1431 मध्ये या चर्चमध्ये राज्याभिषेक झाला होता आणि त्यानंतर ते फ्रान्सचे राजे झाले होते. तसेच 1804 मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनाही याच वास्तूमध्ये सम्राट घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या चर्चला मोठे ऐतिहासिक महत्व आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now