'Lambda', New COVID-19 Variant: जागतिक आरोग्य संघटनेकडून नवा कोरोना 29 देशांत आढळल्याची माहिती; इथे पहा त्याचे जगभरातील अपडेट्स
दरम्यान Peru मध्ये तो पहिल्यांदा आढळला आहे.
भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता WHO कडून आलेल्या माहितीनुसार जगात आता COVID-19 चा एक नवा व्हेरिएंट देखील आढळला आहे. दरम्यान या नव्या व्हेरिएंटचं नाव Lambda आहे. जगात 29 देशांमध्ये तो आढळला असून South America हे त्याचं उगमस्थान असल्याची माहिती आहे. दरम्यान Peru मध्ये तो पहिल्यांदा आढळला असून काही दिवसांपूर्वीच साऊथ अमेरिकेतील परिस्थिती पाहता त्याचं जागतिक आरोग्य संघटनेने Global Variant of Interest असं वर्गीकरण केले आहे. नक्की वाचा: Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या सविस्तर.
Lambda बाबतचे जगभरातील अपडेट्स
- साऊथ अमेरिका, पेरू प्रमाणे चिली मध्ये मागील 60 दिवसांच्या चाचणींमध्ये 32% निदानांमध्ये आहे.
- Argentina आणि Ecuador मध्येही हा नवा वायरस पसरत असल्याची परिस्थिती आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, Lambda हा देखील म्युटेशन असल्याने त्याचा संसर्ग झपाट्याने होण्याची शक्यता आहे किंवा तो अॅन्टिबॉडीजच्या विरूद्ध अधिक सक्षम होऊ शकतो.
- दरम्यान WHO ने अद्याप यावर पुरावे सध्याच्या घडीला कमी असल्याचं सांगितलं आहे. अजूनही Lambda व्हेरिएंटला समजून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
- Lambda व्हेरिएंट ला इतक्यातच घाबरून भयभीत होण्याची गरज नाही अजूनही तो पब्लिक हेल्थला धोका असल्याचं सिद्ध झालेले नाही.
भारतामध्ये दुसर्या लाटेला कारणीभूत असलेला डेल्टा व्हेरिएंट सध्या खूप चर्चेमध्ये आहे. डेल्टा व्हेरिएंट हा भारतामध्ये पहिल्यांदा आढळला. भारताप्रमाणे जगभरात जेव्हा मागील काही महिन्यात कोरोना संकटाबाबत पुन्हा चिंता वाढली होती तेव्हा तो Variant of Concern असं WHO कडून जाहीर करण्यात आले होते. सध्या भारतासह जगात कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक आघाडीच्या लस निर्माण करणार्या कंपनींनी ही कोविड च्या म्युटंट वर देखील त्याप्रभावी असल्याचा विश्वास नागरिकांना दिला आहे.