Disease X: एक्स आजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे? खरोखरच आणू शकतो पुढची महामारी?

युकेचे वॅक्सीन टास्कफोर्सचे प्रमुख केट बीगहॅम यांनी डेलीमेल या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, नवा विषाणू स्पॅनिश फ्लू (1919-1920) सारखा विनाशकारी असू शकतो. ज्याचे स्वरूप अस्पष्ट राहते.

Epidemic | Representational Image (Photo Credits: Pixabay)

World's Next Pandemic: कोविड-19 (COVID-19) विषाणू, ज्याने सबंध जगभरात हाहाकार माजवला. ज्याला कोरोना महामारी म्हणून ओळखले गेले. आता ती आटोक्यात येऊन पूर्णपणे नियंत्रित झाली असली तरी, आता नवी महामारी येऊ घातली आहे का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्याचे कारण एक्स आजार. होय, Disease X हा आजर येणाऱ्या काळामध्ये डोकेदुखी ठरु शकते, असे यूकेच्या आरोग्य विषयकअभ्यासकांना वाटते. युकेचे वॅक्सीन टास्कफोर्सचे प्रमुख केट बीगहॅम यांनी डेलीमेल या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, नवा विषाणू स्पॅनिश फ्लू (1919-1920) सारखा विनाशकारी असू शकतो. ज्याचे स्वरूप अस्पष्ट राहते.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, Disease X हा एक नवा व्हायरस आहे. बॅक्टेरीया आणि बुरशी (फंगस) प्रमाणे असू शकतो. ज्याचा कोणताही उपचार सहसा पाहयाल मिळत नाही. नोव्हेंबर 2022 च्या WHO अहवालात नमूद करण्यात आले आहे की गंभीर आंतरराष्ट्रीय साथीच्या रोगास कारणीभूत ठरू शकणार्‍या अज्ञात रोगजनकाला सूचित करण्यासाठी रोग X चा समावेश करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सन 2018 मध्ये एक्स डिसिजबद्दल पहिल्यांदा उल्लेख केला. त्याचा उल्लेख अज्ञात आजार या संकल्पनेत करण्यात आला. डिसीज एक्स हा एक आंतरराष्ट्रीय महामारी ठरु शकतो. जी मानवी आरोग्यास हाणीकारक ठरु शकते, असा उल्लेखही डब्ल्यूएचओच्या वेबासाईटवर आढळतो.

दरम्यान, यूकेच्या लस टास्कफोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी एक गंभीर इशारा दिला आहे की, X महामारी कमीतकमी 50 दशलक्ष लोकांचा बळी घेऊ शकते. आजाराची संभाव्य व्याप्ती विचारात घेता या महामारीपुढे कोविड-19 काहीच नव्हते, असे वाटू लागते. X हा COVID-19 पेक्षा सातपट जास्त प्राणघातक सिद्ध होऊ शकतो. 1918-19 च्या आपत्तीजनक फ्लू साथीच्या रोगाशी 50 दशलक्षाहून अधिक लोक मारल्या गेल्याचा इतिहासात दाखला, असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे जगभरात सध्या X आजाराबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनाही त्यावर बारीक नजर ठेऊन आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif