वॉशिंग्टन येथे उभारले जाणार पहिले योग विद्यापीठ; स्थापनेसाठी 5 मिलियन डॉलरचा खर्च

योग अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण या विद्यापीठातून देण्यात येणार आहे. लॉस एंजलिस मध्ये विद्यापीठाने आपले कॅम्पस स्थापन केले असून त्यासाठी 5 मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारताच्या बाहेरील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत (America)  वॉशिंग्टन (Washington) येथे सुरू होणार आहे. योग अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण या विद्यापीठातून देण्यात येणार आहे. एप्रिलपासून या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.लॉस एंजलिस मध्ये विद्यापीठाने आपले कॅम्पस स्थापन केले असून त्यासाठी 5  मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. विवेकानंद योग विद्यापीठाच्यावतीने (वायू) योगसन व त्यासंबंधीचे शिक्षण देण्यात येणार आहे. हा योग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ऑगस्ट 2020  पासून सुरू होणार आहे. तर, एप्रिल 2020 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.  मॉरिशस मध्ये बांधणार साई मंदिर; मंत्री अॅलन गानू यांची माहिती

प्राप्त माहितीनुसार,भारतीय योग गुरू एच. आर. नागेंद्र यांची विद्यापीठाच्या चेअरमनपदी नियुक्तीपदी नेमणूक करण्यात आली आहे नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांना 'वायू' च्या स्थापनेमागील मुख्य व्यक्ती समजले जाते. मागील चार दशकांपासून त्यांनी योगाचा प्रसार, शिक्षणासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.केस वेस्टर्न विद्यापीठाचे प्राध्यापक श्री श्रीनाथ यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

दरम्यान, भारतात 2002 मध्ये पहिल्या योग विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर योग आधारीत उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला होता.