Warren Buffett On AI: वॉरेन बफेट यांच्याकडून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'बाबत चिंता व्यक्त, थेट Atom Bomb सोबतच तुलना
नेब्रास्का (Nebraska) येथील ओमाहा (Omaha) मध्ये पार पडलेल्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान बफेट बोलत होते.
Warren Buffett On ChatGPT: अब्जाधीश गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ, वॉरन बफेट ( Warren Buffett) यांनी नव्याने विकसीत होत असलेल्या आणि आपला विस्तार झपाट्याने वाढवणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Generative Artificial Intelligence) बद्दल काहीसा टीकेचा आणि चिंतेचा सूर आळवला आहे. वॉरन बफेट यांनी म्हटले आहे की, एआय (AI) आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गिळंकृत करेन. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि बेकारी वाढेल. वॉरन बफेट यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' ची तुलना थेट 'अणुबॉम्ब' (Atom Bomb) सोबत केली आहे. नेब्रास्का (Nebraska) येथील ओमाहा (Omaha) मध्ये पार पडलेल्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान बफेट बोलत होते. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या हवाल्याने अनेक प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिल आहे.
ओपन एआय द्वारा चालविण्यात येणारे चॅटजीपीटी (ChatGPT) हे चॅटबॉट सध्या आक्रमकपणे बाजार आपल्या काबीज करत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विरचे सीईओ आणि मालक एलॉन मस्क यांच्यासह अनेक टेक उद्योजकांनी एआयच्या प्रसाराविरुद्ध आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सूरात सूर मिसळणारे वक्तव्य वॉरन बफेट यांनी केले आहे. परिणामी लवकरच टेक उद्योजक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) यांच्यात काहीसा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. (हेही वाचा, ChatGPT देऊ शकेल आता तुमच्यासाठी WhatsApp Messages ला उत्तर; जाणून घ्या कसं?)
वॉरन बफेट यांनी म्हटले की, जेव्हा एखादी गोष्ट सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकते तेव्हा मला थोडी काळजी वाटते. कारण मला माहित आहे की आम्ही त्याचा शोध लावू शकणार नाही. आपणास ठाऊक असेलच आपण दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा शोध लावला होता. दरम्यान, या बैठकीला बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर देखील उपस्थित होते.
दरम्यान, ज्यांना "एआयचे गॉडफादर" म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते त्या जेफ्री हिंटन यांनही अशीच चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता हवामान बदलापेक्षा मानवतेसाठी "अधिक तातडीचा" धोका निर्माण करू शकते. बीबीसीसोबत बोलताना त्यांनी असेही सांगितले की चॅटबॉट्स लवकरच मानवी मेंदूच्या माहितीच्या पातळीला मागे टाकू शकतात.