Vladimir Putin Health Update: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची तब्येत ढासळली; दिसू लागले अस्पष्ट, जीभ झाली बधीर- Reports
व्लादिमीर पुतिन यांना कर्करोगासह काही गंभीर आजारांनी ग्रासले आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्सने यापूर्वी केला होता.
गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची प्रकृती चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी पुतीन यांच्या प्रकृतीबाबत अनेक अहवाल समोर आले होते. आता ताज्या वृत्तानुसार पुतिन यांची प्रकृती अलीकडच्या काळात खूपच बिघडली आहे आणि ही गोष्ट डॉक्टरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. मेट्रोच्या रिपोर्टनुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना सतत डोकेदुखीचा त्रास सुरू आहे. यासोबतच त्यांना अस्पष्ट दिसत असून जीभ बधीर झाली आहे.
पुतीन यांची काळजी घेणारे डॉक्टरही पुतीन यांच्या या प्रकृतीमुळे चिंतेत आहेत. पुतिन यांच्या बिघडत चाललेल्या तब्येतीबद्दल अनेक अफवा व्हायरल होत असताना आता हा नवीन अहवाल समोर आला आहे. यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, पुतिन यांच्या उजव्या हाताला आणि पायाला बधीरपणा आला आहे. त्यांनी स्वत: डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली आहे.
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी पुतिन यांना औषध घेण्याचा आणि प्राथमिक उपचारानंतर आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पुतिन डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून काम करत असले तरी. आता पुतिन यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. पुतीन यांची प्रकृती पूर्वीपेक्षा अधिक खालावली आहे. त्यामुळे त्यांच्या जवळचे लोक तणावाखाली आहेत. (हेही वाचा: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी पुन्हा शर्यतीत उतरणार Joe Biden? पहा जाहीर मुलाखतीत काय म्हणाले)
द मिररने रशियन टेलिग्राम चॅनल जनरल एसव्हीआरच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, 70 वर्षीय रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नुकतेच नवीन उपचार घेत आहेत. व्लादिमीर पुतिन यांना कर्करोगासह काही गंभीर आजारांनी ग्रासले आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्सने यापूर्वी केला होता. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना कर्करोगाशिवाय इतरही अनेक आजार आहेत. त्याला खोकला, चक्कर येणे, झोपेचा त्रास, पोटदुखीचा त्रास होत आहे.