Erotic Relationship With Tree: स्वयंघोषीत 'Ecosexual' महिलेचा दावा, म्हणे 'मी ओकच्या झाडाच्या प्रेमात'
मग ते स्त्री आणि पुरुष असो, दोन स्त्रीया किंवा दोन पुरुष यांच्यातील संबंध असो अथवा एक किंवा त्याहून अधिक लोक असो. एका महिलेने मात्र तिचे एका झाडासोबत कामुक संबंध असल्याचे म्हटले आहे..
Vancouver Island News: ब्रिटीश कोलंबियाच्या व्हँकुव्हर बेटावर राहणाऱ्या एका स्वयंघोषित "इकोसेक्शुअल" महिलेने (Ecosexual Woman) अजबच दावा केला आहे. तिने म्हटले आहे की, तिचे ओकच्या (Oak Tree) झाडावर प्रेम आहे. इतकेच नव्हे तर ओकच्या झाडाशी ती कामुक संबंध (Erotic Relationship With Tree) असेही तिने म्हटले आहे. सोन्जा सेमियोनोव्हा, असेया महिलेचे नाव आहे. "इकोसेक्शुअलिटी" (Ecosexuality) या संकल्पनेमध्ये निसर्गाला रोमँटिक (Romance), कामुक आणि मादक रुपात पाहिले जाते. अनेकदा लेखक, कवी, चित्रकार किंवा कल्पनेच्या जगात रमणारे लोक अनेकदा पृथ्वीला एक प्रियकर म्हणून कल्पतात, त्याचे तसे वर्णन करतात. पण, या 45 वर्षीय महिले तिचे झाडाशी असलेल्या अपारंपरिक संबंधांबाबद केलेल्या दाव्यामुळे निसर्गाशी मानवी संबंधाच्या विविध अभिव्यक्तींबद्दल कुतूहल आणि चर्चा या दोन्ही गोष्टींना उधाण आले आहे.
इकोसेक्सुअलिटी आणि महिलेचा दावा:
सेमिओनोव्हा, स्वयंघोषीतपणे "इकोसेक्शुअल" हे लेबल स्वीकारते. जे व्यक्तींना निसर्गात रोमँटिकरित्या गुंतवून ठेवतात. तिच्यासाठी, कोविड-19 लॉकडाऊनमध्ये नियमित चालताना तिच्या निवासस्थानाजवळील ओकचे झाड एक केंद्रबिंदू बनले. वृक्षाशी असलेले तिचे नाते स्पष्ट करताना, ओकवर आपले प्रेम असल्याच्या भावना व्यक्त केल्या. परंपरागत मानवी नातेसंबंधांच्या पलीकडे जाणारा एक कामुक अनुभव असल्याचेही तिने म्हटले आहे. (हेही वाचा, Bodybuilder Divorced Sex Doll Wife: बॉडीबिल्डर Yurii Tolochko याचा सेक्स डॉल पत्नीसोबत घटस्फोट)
मानवी प्रणयापासून वेगळेच काहीतरी:
सेमियोनोव्हा या वृक्षाशी असलेले तिचे नाते मानवी नातेसंबंधांपेक्षा वेगळे आहे, यावर जोर देते. तसेच, या प्रेमाबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि गैरसमजाबद्दल स्पष्ट करताना ती म्हणते इकोसेक्शुअलिटीमध्ये निसर्गासह शारीरिक कृतींचा समावेश नाही. परंतु कामुकतेचा एक अनोखा शोध आणि अनूभव आपल्याला मिळू शकतो. ही स्त्री असे ठामपणे सांगते की तिने वृक्षासोबत अनुभवलेली उपस्थिती आणि ऊर्जा तिच्या इच्छेशी जुळते. जी मानवी भावना आणि निसर्ग यांच्यातील नाते गुंफण्याबद्दल एक अपारंपरिक दृष्टीकोन देते. (हेही वाचा, ऐकावं ते नवलच! एकाच झाडाला 40 प्रकारची फळं, किंमत फक्त 19 लाख रुपये)
इन्स्टा पोस्ट
इकोसेक्सुअलिटी आणि हवामान जागरूकता:
सेमियोनोव्हा यांचा असा विश्वास आहे की इकोसेक्शुअलिटी अनेक लोकांमध्ये अंतरर्भूत आहे. निसर्गाशी पुन्हा संपर्क केल्याने हवामान समस्यांचे निराकरण होऊ शकते. नैसर्गिक वातावरणात सहली आणि गिर्यारोहण यांसारख्या कृती म्हणजे निसर्गातून निर्माण होणारी जीवनशक्ती आणि कामुकता यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने असे सुचवले आहे की पर्यावरणाशी अधिक सहजीवन संबंध वाढवून नागरिकांना फायदे मिळू शकतात आणि पर्यावरणीय परस्परसंबंधांच्या वाढीव जागरुकतेमध्ये योगदान देऊ शकते. जगे विविध प्रकृती, विकृती, स्वभाव आणि विचारांच्या लोकांनी, प्राण्यांनी आणि तितक्याच विविधतेने भारलेले आहे हे या महिलेच्या दाव्याने पुन्हा एकदा पुढे आले आहे.