F-1, M-1 Nonimmigrant Visa Row: डॉनल्ड ट्रम्प प्रशासनाकडून Fall 2020 Semester च्या अनिवासी विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा
अमेरिकेमध्ये आता होमलॅन्ड सिक्युरिटी विभागाकडून यंदा फॉल 2020 सेमेस्टरसाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या F1, M1 व्हिसा नियमांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत
अमेरिकेमध्ये आता होमलॅन्ड सिक्युरिटी विभागाकडून यंदा फॉल 2020 सेमेस्टरसाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या F1, M1 व्हिसा नियमांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान काल अचानक ट्रम्प शासनाकडून हे दोन्ही व्हिसा रद्द करून विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील प्रवेश रोखण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र यावर अमेरिकेतील कायदे विधिज्ञ सह जगभरातून टीका झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात कॉर्स पूर्ण करण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात हा विद्यार्थी, पालकांना मोठा दिलासा ठरला आहे. मात्र ही तात्पुरती सोय असल्याने आता विद्यार्थ्यांना संबंधित व्हिसा केंद्र, दूतावास केंद्रामध्ये जाऊन त्याच्या व्हिसाची व्हॅलिडीटी तपासून पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होते. यंदा अनेक विद्यार्थ्यांना अॅडमिशन देण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाव्यस्था आहे. अमेरिकेमध्ये प्रामुख्याने अनिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, व्होकेशनल कोर्स करण्यासाठी F1, M1व्हिसा दिले जातात.
ANI Tweet
अमेरिकेत भारतामधून अनेक विद्यार्थी टेक्नॉलॉजी, सायंस, फार्मसी या शाखेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. यंदा कोरोना व्हायरस जागतिक संकटाचा फटका शिक्षण क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये अचानक व्हिसा रद्द करण्याचे फर्मान काढल्याने अनेक विद्यार्थ्यांना अमेरिका सोडून मायदेशी परतावे लागणार होते. मात्र आता काही प्रमाणात विद्यार्थ्यांवरील ताण कमी झाला आहे.
सध्या अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. worldometers.info च्या माहितीनुसार, युएसएमध्ये एकूण कोरोनाबाधिताचा आकडा 3,097,084 च्या पार गेला आहे. दिवसागणिक त्यामध्ये वाढ होत आहे.