US Storm Death: अमेरिकेत चक्रीवादळातील मृतांचा आकडा 20 वर; टेक्सास, आर्कान्सास, ओक्लाहोमा आणि केंटकी राज्यांचा फटका

मेमोरियल डे वीकेंडला अमेरिकेच्या टेक्सास, आर्कान्सास, ओक्लाहोमा आणि केंटकी या राज्यांमध्ये वादळामुळे किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.

(Photo Credits: X/@natalieclydesTV)

US Storm Death: अमेरिकेच्या टेक्सास, ओक्लाहोमा, केंटकी आणि आर्कान्सा राज्यांमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे मोठी जिवीतहानी झाली आहे. तेथे मृतांचा आकडा वाढला असून तो 20 वर गेला आहे. टेक्सासमध्ये, वादळाने कुक काउंटी येथील रस्त्याच्या कडेला असलेला प्रवासी थांबा उद्धस्थ केला. मोबाईल दुकानांचे नुकसान केले. सोमवारी 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. (हेही वाचा: Tornado in America: अमेरिकेत चक्रीवादळामुळे विनाश सुरूच, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू)

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबोट यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सात जण ठार झाले असून 100 हून अधिक जण जखमी झाले होते. आर्कान्सा राज्यपाल सारा हकाबी सँडर्स यांनी रविवारी पत्रकार परिषदेत आठ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली होती.

केंटकीमध्ये, लुईव्हिलचे महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांनी शनिवारी रात्रीच्या वादळानंतर एका मृत्यूची पुष्टी केली. मर्सर काउंटी, केंटकी येथे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे मर्सर काउंटीचे आपत्कालीन व्यवस्थापन संचालक ब्रॅड कॉक्स यांनी सांगितले. तिसऱ्या मृत्यूची पुष्टी केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी केली. त्यांनी पाच केंटकी काउंटीमध्ये आपत्कालीन क्षेत्र घोषित केले.

poweroutage.us च्या म्हणण्यानुसार, मिसुरी, आर्कान्सा आणि केंटकीमधील सुमारे 400,000 नागरिकांनी चक्रीवादळाचा फटका बसला. चक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif