US Presidential Election 2020: कोण होतील अमेरिकेचे नवे राष्ट्रपती? Siberian Bear आणि Tiger ने वर्तवली भविष्यवाणी, घ्या जाणून
सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बिडेन (Joe Biden) गेले काही आठवडे
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकींकडे (US Presidential Election 2020) लागले होते. सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बिडेन (Joe Biden) गेले काही आठवडे जोरदार प्रचारसभा घेत आहेत. आता आज 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे. सध्या मार्केटमध्ये, जनतेच्या तोंडी अमेरिकेच्या निवडणुकीच्या भविष्यवाणीचा अंदाज दिसून येत आहे. आता, सायबेरियन अस्वल (Siberian Bear) आणि वाघाने (Tiger) 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या विजेत्याबाबत आपली भविष्यवाणी वर्तवली आहे. सायबेरियन प्राणीसंग्रहालयात ठेवलेल्या नर तपकिरी अस्वल बुयानने (Buyan) अमेरिकेच्या निवडणुकीत जो बिडेन हे डोनाल्ड ट्रम्पवर विजय मिळवतील असा अंदाज वर्तवला आहे.
यासाठी बुयानसमोर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांचा फोटो असणारे दोन कलिंगड ठेवले होते. बुयानने त्यांची काळजीपूर्वक तपासणी केली. एका क्षणाच्या विलंबानंतर, अस्वलाने बिडेन यांचा फोटो असणारे कलिंगड उचलले आणि उत्सुकतेने ते तो खाऊ लागला. रोव रुचे (Roev Ruchey) मधील दोन इतर प्राणी तज्ञांनी विरोधी पक्षाची बाजू घेतली. बार्टेक या अमूर वाघाने ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती होतील अशी भविष्यवाणी केली. तर 'खान' या पांढऱ्या बंगाल वाघाने शेवटी ट्रम्प यांचे कलिंगड उखडून टाकण्यापूर्वी बिडेन यांचा फोटो असलेल्या कलिंगडासोबत थोडा वेळ घालवला.
रोव रुचे प्राणीसंग्रहालयाचे संचालक, Andrei Gorban म्हणाले की, प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या डोळ्यासमोर, डोनाल्ड ट्रम्प यांची स्थिती पूर्वीच्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीपेक्षा यंदा जास्त आत्मविश्वासपूर्ण होती. ट्रम्प यांच्या मागच्या निवडणुकीच्या शर्यती दरम्यान, त्यांची स्थिती कमकुवत असूनही इथल्या सर्व प्राण्यांनी तेच राष्ट्रपती होतील असा अंदाज वर्तवला होता. ओरॅकल बियर बुयान यानेही 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. (हेही वाचा: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक रॅलींमुळे तब्बल 30,000 लोकांना Coronavirus ची लागण, तर 700 जणांचा मृत्यू- Stanford University Researchers)
दरम्यान, बीबीसीच्या मते, 3 नोव्हेंबरला मतदान सुरू होण्यापूर्वी सुमारे 10 कोटी अमेरिकन लोकांनी मतदान केले. इतक्या लवकर मतदानामुळे अमेरिकेत विक्रमी मतदान होऊ शकते. 2016 पेक्षा यंदा दोन तृतीयांशपेक्षा अधिक लवकर मतदान झाले आहे. अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार जो बिडेन यांचे पारडे थोडे भारी आहे.