भारताला सशस्त्र ड्रोन विकण्यास अमेरिकेची मंजूरी, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देण्याचीही ऑफर
तसेच, आम्ही भारताला इंटिग्रेटिड एयर अॅण्ड मिसाइल डिफेन्स टेक्नॉलजी ऑफर केली आहे, असेही या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना म्हटले आहे.
अमेरिका (America) सरकारने भारताला सशस्त्र ड्रोन (Armed Drones) विकण्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच अमेरिकेने भारताला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (Missile Defence Systems) विकण्याचीही ऑफर केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, भारताला आपली लष्करी क्षमता वाढवत हिंद-प्रशांत महासागरात आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासही मदत होणार आहे. अमेरिकेकडून भारताला मान्यता आणि ऑफरवाला हा प्रस्ता याच वर्षी फेब्रुवारी मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाक तणावाच्या काळात मिळाला आहे.
इतकेच नव्हे तर, शेजारी चीन ज्या पद्धतीने आपले लष्करी सामर्थ्य वाढवतो आहे तो सुद्धा भारतासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. त्यामुळे अशिया खंडात शांतता आणि संतुलन राखणार शक्ती उभी करण्यासाठी भारताला अमेरिकेची मदत होऊ शकते. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प प्रशासन भारताला आपल्या सैन्यातील सर्वात खास तंत्रज्ञानही भारताला द्यायला तयार आहे. (हेही वाचा, अमेरिकेकडून भारताला व्यापारात 5 जून पासून कोणतीही सूट मिळणार नाही- डोनाल्ड ट्रम्प)
व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना सांगितले की, अमेरिकेने भारताला सैन्य ड्रोन्स विकण्यास मान्यता दिली आहे. तसेच, आम्ही भारताला इंटिग्रेटिड एयर अॅण्ड मिसाइल डिफेन्स टेक्नॉलजी ऑफर केली आहे, असेही या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना म्हटले आहे. मात्र, हे तंत्रक्षान अमेरिका भारताला नेमके किती कालावधीत पोहोचवेल याबाबत मात्र त्याने माहिती दिली नाही.