पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर टाळा, अमेरिकेचा आपल्या विमान कंपन्यांना इशारा; सांगितले हे कारण

आपल्या विमान कंपन्यांना धोक्याचा इशारा देताना अमेरिकेने म्हटले आहे की, प्रवास, व्यापार किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पाकिस्तानी हवाई हद्द (Pakistan Airspace) वापर करणे टाळा.

Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

यूनाइटेड स्टेट्‍स (United States) ने विमान सेवा पुरवणाऱ्या आपल्या कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. आपल्या विमान कंपन्यांना धोक्याचा इशारा देताना अमेरिकेने म्हटले आहे की, प्रवास, व्यापार किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पाकिस्तानी हवाई हद्द (Pakistan Airspace) वापरणे टाळा. पाकिस्तानी दहशतवादी (Pakistan Extremist) संघटना अथवा काही लष्करी गट (Militant Groups in Pakistan) दहशतवादी हल्ला करण्याचा धोका आहे. त्यामुळे येत्या काही काळासाठी हवाई मार्गासाठी पाकिस्तानी हवाई प्रदेशाचा वापर करणे टाळा. अमेरिकेच्या इशाऱ्याच्ये एक पत्र जोडत वृत्तसंस्था एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देणारे ट्विट केले आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही काळापासून प्रचंड नाजूक स्थितीतून जात आहे. त्यातच बालकोट स्ट्राईकनंदर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यामुळे पाकिस्तानला तब्बल 688 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतासाठी हवाई हद्द बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच अमेरिकेनेही पाकिस्तानी हद्दीतून प्रवास करण्यास आपल्या विमान कंपन्यांना रोखले तर पाकिस्तान अधिकच आर्थिक गर्तेत जाणार आहे. कारण, अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकत इतर देशही पाकिस्तानची हवाई हद्द वापरणे टाळू शकतात. (हेही वाचा, पाकिस्तानमध्ये गरिबीचा कहर; रस्ते व इमारतीनंतर आता कर्जासाठी इम्रान खान गहाण ठेवणार जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ)

एएनआय ट्विट

पाकिस्तानी हवाई हद्द बंद झाल्यावर यूरोप, अमेरिका आणि खाडी क्षेत्रातून प्रवास करण्यासाठी अधीक दीर्घ मार्ग निवडावा लागणार आहे. लांबच्या अंतरावरुन प्रवास केल्याने प्रवासाचा वेळही वाढणार आहे. अगदी भारतातून अमेरिकेला जाण्याचा विचार केला तरीही हे अंतर सुमारे 3 तासांनी वाढणार आहे. प्रवासाचे अंतर वाढले तर, क्रू मेबर्स, प्रवासी भाडे, विमानाचे इंधन अशा सर्वच गोष्टींमध्ये वाढ होत असते. त्यामुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांवर आर्थिक भार पडतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif