IPL Auction 2025 Live

United States Presidential Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी पुन्हा शर्यतीत उतरणार Joe Biden? पहा जाहीर मुलाखतीत काय म्हणाले

ते पुन्हा निवडणूकीमध्ये उतरले तर त्यांच्या दुसर्‍या टर्मच्या शेवटाला ते 86 वर्षांचे असतील.

Joe Biden | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (United States Presidential Election) देखील आपण लढण्याचा प्लॅन करत असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पण अद्याप तयारी नसल्याने ते बोलून दाखवले नसल्याचं एका मुलाखती मध्ये म्हटलं आहे. नुकतीच बायडन यांनी NBC च्या "Today" या कार्यक्रमासाठी मुलाखत दिली आहे.

जो बायडन हे अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. ते पुन्हा निवडणूकीमध्ये उतरले तर त्यांच्या दुसर्‍या टर्मच्या शेवटाला ते 86 वर्षांचे असतील. त्यांची पुन्हा डेमोक्रॅटिक पार्टी कडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये उतरण्याची इच्छा आहे. बायडन आणि व्हाईस प्रेसिडंट कमला हॅरिस यांना एकत्र उतरायला आवडेल. असे NBC News चे वृत्त आहे. बायडन यांनी यापूर्वी देखील पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

व्हाईट हाऊसचे वरिष्ठ अ‍ॅडव्हायझर आता बायडनच्या रि इलेक्शन साठी कॅम्पेन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. असेही काही सूत्रांच्या हवाल्याने NBC News ने सांगितले आहे. निर्णयाचा भाग झाला आहे.

2024 च्या डेमोक्रॅटिक राष्ट्रपती पदाच्या नामांकनासाठी सध्या दोन घोषित उमेदवार आहेत. ज्यामध्ये लेखिका Marianne Williamson आहेत आणि लस विरोधी काम करणारे Robert Kennedy Jr.आहेत. कमी मंजूरी रेटिंग असूनही, डेमोक्रॅटिक पॉवर ब्रोकर्सनी सूचित केले आहे की ते सर्व बिडेनच्या पुनर्निवडणुकीच्या बोलीसाठी तयार आहेत. बायडन यांनी अधिकृतपणे ते मिळविण्याचा त्यांचा हेतू जाहीर करण्यापूर्वीच ही तयारी झाल्याचं एनबीसी न्यूजचे वृत्त आहे.

माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत.  बिडेन समोर ते  रिपब्लिकन पक्षाकडून प्रमुख दावेदारांपैकी एक आहेत. सध्या ते  76 वर्षांचे  आहेत आणि ते जिंकल्यास 78 वर्षी ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील. 2020 मध्ये ते बिडेन यांच्याकडून मात्र ते निवडणूक हरले होते. आता वाढत्या कायदेशीर अडचणींमध्ये ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची योजना आखत आहेत.