Dog Attack in US: पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील घटना

या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Dog Attack in US:

Dog Attack in US:  अमेरिकेच्या टेनीस शहरामधील नॉक्सोव्हिलमध्ये एका पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात सहा आठवड्यांच्या  बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. पाळीव कुत्र्याच्या या प्रकरणामुळे एकीकडे चिंता वाढली. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. दिवसेंदिवस कुत्र्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे. (हेही वाचा- पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबानी गेल्या आठ वर्षापूर्वी हस्की जातीचा कुत्रा पाळला होता. या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा दिवसानंतर चिमुकल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एजरा मन्सूर असं मृत झालेल्या बाळाचे नाव आहे. मृत बाळाच्या पालकांनी सांगितले की, बाळाच्या मेंदूतून रक्तस्राव झाला आणि मेंदूला सुज आली होती. उपचारादरम्यान बाळाने प्राण सोडले. या घटनेनंतर कुटुंबांनी इतर कुटुंबाना चेतावणी दिली आहे की, पाळीव प्राण्यांना आपल्या चिमुकल्या बाळासोबत एकत्र ठेवू नका. हे धोकादायक ठरू शकते.

पालकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इतर गजरू बाळांना मदत होईल या करीता मृत बाळाच्या अवयव दान करण्याची परवानगी पालकांनी दिली आहे. कुत्र्याच्या हल्ल्या प्रकरणी शेरीफ कार्यालयाने मुलाच्या मृत्यूची चौकशी केली जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif