Unemployment Broke Record in America: अमेरिकेत बेरोजगारीचा रेकॉर्ड ब्रेक, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

करोडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका उद्भवला आहे. जगातील सर्वश्रेष्ठ देश अमेरिकेत सुद्धा हिच स्थिती आहे. कोविड19 वर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रम्प सरकारच्या समोर रोजगाराचा मुद्दा सर्वात मोठे आव्हान ठरु शकते. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक आणि विरोधी पक्ष नेता या मुद्द्यावरुन जोरदार टीका करत आहेत.

President Donald Trump | (Photo Credits: AFP)

कोरोना व्हायरसमुळे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका उद्भवला आहे. जगातील सर्वश्रेष्ठ देश अमेरिकेत सुद्धा हिच स्थिती आहे. कोविड19 वर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रम्प सरकारच्या समोर रोजगाराचा मुद्दा सर्वात मोठे आव्हान ठरु शकते. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक आणि विरोधी पक्ष नेता या मुद्द्यावरुन जोरदार टीका करत आहेत. याच दरम्यान, अमेरिका काँग्रेस एका आर्थिक दिलासादायक विधेयकावर वादविवाद करत आहेत. तर कोरोना व्हायरसमुळे लाखो नागरिकांना बेरोजगार केले असल्याची पुष्टी ताज्या आकडेवारीवरून मिळाली आहे. 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 11 लाख नवीन लोकांनी बेकारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे. या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत 1 लाख 35 हजार नवीन लोकांची भर पडली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रमुख अर्थशास्री नेन्सी वंडेन हाउटन यांच्या मते, लाभाचा दावा करण्याऱ्या लोकांची संख्या असाधारण रुपापेक्षा अधिक आहे. हे ग्रेट डिप्रेशन म्हणजेच महामंदी दुप्पटीपेक्षा अधिक आहे. अशातच श्रम बाजारची स्थिती अधिक उत्तम होण्यासाठी अधिक लागू शकतो. गेल्या आठवड्यात सुरुवातीला बेरोजगारी संबंधित आकडे 21 आठवड्यात पहिल्या दहा लाखांच्या खाली आला होता. श्रम विभागाच्या नुसार, ही संख्य 9 लाख 71 हजारांवर होत. तर मार्च महिन्यात कोविड19 ची परिस्थिती वेळी पहिल्यांदाच बेरोजगारी भत्त्यसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 70 लाखांवर पोहचली आहे.

मार्च महिन्यात अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे चौपट झाली होती. कारण हॉटेल, बार ते शाळा, जिम सर्व बंद करावे लागले होते. दरम्यान, महासंकटाच्या पूर्वी बेरोजगारीचा दर रेकॉर्ड न्यूनतम स्तर म्हणजेच 3.5 टक्क्यांवर पोहचली होती. जी आता जवळजवळ 10.2 टक्के असल्यचे सांगितले गेली. काही काळापूर्वी 10.6 टक्के रेकॉर्ड पर्यंत वाढला होता. या दरात घट होण्याचे कारण म्हणजे अमेरिकेत गेल्या तीन महिन्यात 93 लाख कामगारांना कामावर ठेवले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात 2 करोड 20 लाख लोकांना आपल्या नोकऱ्य गमवाव्या लागल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif